तडशिनहाळ येथे हलकर्णी महाविद्यालयातर्फे निर्माल्य संकलन - चंदगड लाईव्ह न्युज

20 September 2021

तडशिनहाळ येथे हलकर्णी महाविद्यालयातर्फे निर्माल्य संकलन


तडशिनहाळ (ता. चंदगड) येथे हलकर्णी महाविद्यालयातर्फे निर्माल्य गोवा करताना ग्रामस्थ,स्वयंसेवक व शिक्षक वर्ग 

माणगाव / सी. एल. वृत्तसेवा

      हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तडशिनहाळ येथे निर्माल्य संकलन करून समाजप्रबोधनाचे कार्य केले. दरवर्षी राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध उपक्रम होतात. त्यामध्ये निर्माल्य संकलन सातत्य राखले आहे. निर्माल्य व प्लास्टिक पाण्यात टाकू नका व पाणी प्रदूषित करू नका असे प्रबोधन करत दरवर्षी निर्माल्य स्वतंत्रपणे संकलन करून गणेश भक्तांसह समाजाला सामाजिक जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. तडशिनहाळ गावाबाहेर असणाऱ्या तलावाच्या काठावर हे संकलन केले. प्रकल्प अधिकारी डॉ. राजेश घोरपडे, प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पोतदार, प्रकल्प अधिकारी प्रा. सी.एम. तेली यांनी आणि राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी आपापल्या गावी प्रबोधन केले. यावेळी सरपंच सौ. सुजाता  कदम, प्रा. पुंडलिक दरेकर, नारायण पाटील, राजू बोलके ,मोहन नेवगिरे यांच्यासह बहुसंख्येने ग्रामस्थ होते. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य पी. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment