चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले.
रविंद्र पाटील हे सध्या मराठी विषयाचे सहा. शिक्षक म्हणून राजर्षी शाहू माध्यमिक विद्यालय शिनोळी बु (ता. चंदगड जि. कोल्हापूर) येथे २० वर्षे कार्यरत आहेत. त्यांचे गाव बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी आहे.
रविवार दिनांक 5 सप्टेंबर 2021 रोजी अरविंद घट्टी फार्म हाऊस, केएलई कॉलेज समोर जोडकुरळी चिकोडी येथे कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील आंतरराज्य पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप मेडल, विशेष प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व म्हैसूर फेटा बांधून प्रदान करण्यात येणार आहे.
जाहिरात
![]() |
जाहिरात |
गावात गेली २० वर्षे ते ग्रामीण साहित्य संमेलनाची साहित्य पंढरी उभी केली आहे. तसेच बेळगाव शहरात ही गेली दोन वर्षे मराठी अस्मिता संवर्धन होण्यासाठी राज्यस्तरीय संमेलनाचे नेटके नियोजन करतात. सीमाभागात मराठीची होणारी गळचेपीचा उद्रेक त्यांनी थेट बडोदा येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या काव्यमैफिलीत 'लढा ' या कवितेतून अन्याय मांडून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच व्यासपीठावर त्यांना सीमाकवी म्हणून जाहीर केले.
हाती घेतलेल्या कामात स्वतःला झोकून देणे हा त्यांचा स्वभाव. त्यामूळेच त्यांच्याकडे अनेक पदे चालून आली आहेत. ते सध्या राज्याध्यक्ष म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद (कर्नाटक राज्य ) कार्यरत आहेत.
जिल्हाध्यक्ष- आविष्कार फौंडेशन भारत बेळगाव शाखा
तालुका समन्वयक - चंदगड तालुका मराठी अध्यापक संघ
कोल्हापूर जिल्हाउपाध्यक्ष नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र
त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून त्यांना आजतागायत अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचा
कोजिम प्रेरणा पुरस्कार* सन्मानीत आहेत .
दै. जनमतचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार - २०१९
राजा शिवछत्रपती पारगड - चंदगड सन्मान - २०१९
काव्य कला गौरव पुरस्कार, पुणे -२o१८
आदर्श पत्रकार पुरस्कार , सासवड पुणे - २०१९
आविष्कार फौंडेशनचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार - २०२०
बेळगाव केएलई वेणुध्वनी एफ . एम. रेडिओ केंद्रावर तीन वेळा मुलाखत व कार्यक्रमात सहभाग
सीमाकवी, पत्रकार, तंत्रस्नेही शिक्षक, समालोचक, निवेदक तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात कार्यरत चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाकडून हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, कथाकथन स्पर्धा, उखाणे स्पर्धा, पत्रलेखन स्पर्धा, सामान्य तसेच ऑनलाईन गुगलमीट मार्ग दर्शन , चर्चासत्र यांचे नेटके नियोजन करण्यात सरांचा हातखंडा आहे.
श्री. पाटील स्वतः तंत्रस्नेही असून आपल्या सहकाऱ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून बेळगाव येथे दोन दिवसांचे तंत्रस्नेही शिबीर यशस्वीपणे भरविले. प्रभावीपणे व्हिडिओ निर्मिती कशी करावी याच्या कार्यशाळा ही घेतात. या सर्व त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना यावर्षी शैक्षणिक सेवेचा आंतरराज्य पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.
या फाउंडेशनची स्थापना बेळगाव चे माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, भारतीय सैन्य दलाचे निवृत्त ब्रिगेडियर सुधीर सावंत, ॲड. सुनील शिंदे, उद्योगपती सुरेशदादा पाटील व अभियंते मनोहर वड्डर यांनी केलेली आहे.
या आंतरराज्य पुरस्कारामुळे कुद्रेमानी व शिनोळी बु. गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. यामुळे रवींद्र पाटील यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment