शिनोळी बुद्रुक येथे आरोग्य तपासणी कक्ष लोकार्पण सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2021

शिनोळी बुद्रुक येथे आरोग्य तपासणी कक्ष लोकार्पण सोहळा संपन्न

शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड) येथे आरोग्य तपासणी कक्ष लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवर. 

शिनोळी / सी. एल. वृत्तसेवा

         कोरोनाच्या हाणामारीत मुळे सर्व आरोग्य यंत्रणाच कोलमडली आहे. यामुळे इथल्या सर्वसामान्य ग्रामस्थांचे नाहक हाल होऊ नये यासाठी गावातच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शिनोळी खुर्द चे शिनोळी बु. येथे एक आरोग्य तपासणी कक्ष पुढे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नाईकवाडी यांच्या हस्ते फीत कापून लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

          यावेळी तलाठी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. या आरोग्य तपासणी कक्षात दर आठवड्यातील दोन दिवस या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे. या केंद्रात समुदाय अधिकारी म्हणून प्रभाकर कुलकर्णी हे काम पाहणार आहेत. या ठिकाणी लसीकरण, आरोग्य शिबिर, आरोग्य सर्वे आणि आरोग्यविषयक आशा वर्कर्स आहेत त्यांनाऔषध गोळ्या उपलब्ध होणार आहेत. नियमित तपासणी शुगर आणि बीपी ची असेल आणि शुगर बीपीचा ही मोफत गोळ्या औषध उपलब्ध असणार आहेत. यामुळे शिनोळी बुद्रुक गावातील सर्वसामान्यांची ही सोय करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

                                                                          जाहिरात

जाहिरात

          गावातील गोरगरीब जनतेची सेवा व्हावी आणि वेळेत आरोग्य तपासणी व्हावी यासाठी ग्रामपंचायतचे सरपंच नितीन नारायण पाटील आणि त्यांचे ग्रामपंचायत सर्व सहकारी यांच्या या प्रयत्नातून याठिकाणी आरोग्य तपासणी कक्ष लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

              यावेळी सरपंच नितीन नारायण पाटील, उपसरपंच रघुनाथ गुडेकर' ग्रामपंचायत सदस्य अमृता जत्ती, मारुती पाटील, परशराम चु.पाटील, ग्रामसेवक महादेव पाटील, हणमंत नाकाडी, मोनेश्री चव्हाण, नारायण गुडेकर, अरुण बामुचे, सोमनाथ शहापूरकर, एकनाथ राघोजी, श्रीपती गुडेकर यासह आशा वर्कर दीपा गुडेकर, लक्ष्मी तानगावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.




No comments:

Post a Comment