![]() |
दशरथ पाटील |
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
शिवसेना शाखा कालकुंद्री (ता. चंदगड) चे संस्थापक शिवसैनिक दशरथ हणमंत पाटील- लिंबाजीगावडे (पुढारी) वय ७५ यांचे बुधवार दिनांक १/९/२०२१ रोजी हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. दशरथ हे परिस्थितीने गरीब असले तरी स्वाभिमानी, निष्ठावान व कट्टर शिवसैनिक म्हणून तालुक्यातील शिवसैनिकांत परिचित होते. कालकुंद्री शिवसेना शाखेतील पदाधिकारी, शिवसैनिकांसह विभागप्रमुख, तालुकाप्रमुख व जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना त्यांच्याबद्दल आदर होता. कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिली शिवसेना शाखा कालकुंद्री येथे सन १९८५ मध्ये सुरू झाली. तेव्हापासून ते स्वतः निष्ठावान राहून गावातील शिवसैनिकांना एकत्रित ठेवण्यासाठी प्रयत्नशील होते. गावातील शिवजयंती उत्सव, नाट्य रंगभूमी कलाकारांना एकत्रित करणे, शालेय लेझीम पथक व इतर सामाजिक कार्यात अग्रभागी असत. गावातील आबालवृद्धांत ते लोकप्रिय होते. गाव व पंचक्रोशीतील लोक त्यांना प्रेमाने 'आमदार' म्हणून हाक मारायचे. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे शिवसेना शाखा व कालकुंद्री येथील सामाजिक उपक्रमांची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या पश्चात विवाहीत तीन भाऊ व परिवार आहे.
No comments:
Post a Comment