बेळगाव येथे ओशो मेडिटेशन सेंटरचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

01 September 2021

बेळगाव येथे ओशो मेडिटेशन सेंटरचा शुभारंभ

ओशो मेडिटेशन सेंटरच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर.


बेळगाव / प्रतिनिधी

      बेळगाव नानावाडी येथील आश्रय कॉलनी येथे नुकताच दि.२७ रोजी  ओशो मेडिटेशन सेंटरचा उद्घाटन सोहळा साधक सृष्टी आरंभावी आणि नागेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

          बेळगाव येथील हा पहिलाच मेडिटेशन सेंटर साधक साधना सपारे यांनी सुरु केला आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातील ताण तणाव स्वत :चा कमी करण्यासाठी ध्यान साधना महत्वाची आहे.  या ध्यान केंद्रात ओशोचे 112 ध्यान असून यापैकी नादब्रह्म ध्यान , कुंडलिनी ध्यान , विपश्यना ध्यान ' चक्रासाऊंड ध्यान व नटराज ध्यान असे मुख्य पाच ध्यान येथे घेतले जाणार आहेत.

                                                                             जाहिरात

जाहिरात

        ध्यान म्हणजे एकरूप होणे. त्यासाठी आपण श्वासापासून सुरुवात करतो! ध्यानाची पद्धत अगदी सोपी आहे. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते. ध्यान केल्याने सुख दुःखाच्या पलीकडील अनुभूवती होते. ध्यानाने कमवलेले ऊर्जा 24 तास टिकविण्याचे काम करते , जीवनाला आनंद देते. स्थिर होण्याची कला शिकवते. आपलं स्वास्थ उत्तम होण्यासाठी तसेच मनशांती ही लाभते आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. यासाठी ध्यान महत्त्वाचे आहे. असे ध्यान केंद्राच्या प्रमुख साधक साधना सपारे यांनी  सांगितले.

      यासाठी नि:शुल्क ध्यान साधना करण्यासाठी संपर्क करा *9964332199*   यावेळी साधक अनुपमा धाखोजी ,अशोक नांदरे ,साधक शितल , साधक नागराज , योगगुरु प्रभू ,संतोष आरंभावी , भारती आरंभावी व नंदकुमार सपारे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment