शिवाजी पाटील यांच्या नागझरी काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

12 September 2021

शिवाजी पाटील यांच्या नागझरी काव्यसंग्रहाचे आज प्रकाशन

 

शिवाजी पाटील

कागणी : सी. एल. वृत्तसेवा

     नागरदळे (ता. चंदगड) येथील हायस्कूलच्या सभागृहात नागरदळे चे सुपुत्र व सध्या मुंबई येथील रहिवाशी शिवाजी पाटील यांच्या नागझरी या काव्यसंग्रहाचे प्रकाशन रविवार दि. 12 रोजी दुपारी तीन वाजता मान्यवरांच्या उपस्थित होत आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, ज्येष्ठ कवी प्रा. चंद्रकांत पोतदार,  महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू जोशीलकर, लेखिका पारू नाईक- देसाई, प्रा. गोपाळ गावडे,  विजयकुमार दळवी, सन्ना मोरे, पी. ए. पाटील, सरपंच दिलीप पाटील, दिग्दर्शक नाट्यदिग्दर्शक जीवन कुंभार, लक्ष्मीबाई जोशिलकर, गंगुबाई पाटील यांच्या हस्ते होणार आहे. सर्व साहित्यप्रेमीनी उपस्थित रहावे, असे आवाहन तुषार पाटील, सत्यजित पाटील, कृष्णा बामणे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment