दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भरली 'बाप्पांची शाळा', उपशिक्षणाधिकारी बी.डी. टोणपेनी साधला चिमुकल्यांशी संवाद - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2021

दि न्यू इंग्लिश स्कूल मध्ये भरली 'बाप्पांची शाळा', उपशिक्षणाधिकारी बी.डी. टोणपेनी साधला चिमुकल्यांशी संवाद

उपशिक्षणाधिकारी बी .डी.टोणपे विद्यार्थ्याशी संवाद साधताना

तेऊरवाडी - एस .के. पाटील
शाळा या खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या प्रयोगशाळा असतात. असे म्हटलं तर वावगे ठरू नये. आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना खूप महत्व आहे.
लोकमान्य टिळकांनी एका उदात हेतूने सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरवात केली होती. पण अलिकडे गणेश उत्सवाला वेगळेच वळण मिळाले आहे. रासायनिक रंग, प्लास्टर ऑफ पॅरीस पासून बनविलेल्या मूर्तीपासून मोठया प्रमाणात प्रदूषण होत आहे. याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. याची जाणीव विद्यार्थ्याना व्हावी म्हणून  दि न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य आर.आय. पाटील यांनी इको फ्रेंडली गणपती बाप्पा हा उपक्रम राबविला. यामध्ये पाचवी ते दहावीच्या एकशे दहा मुलांनी सहभाग नोंदवला. माती, शेडू, कागदी लगदा, पीठ यापासून विद्यार्थ्यांनी आकर्षक मूर्त्या बनविल्या. रासायनिक रंगाऐवजी हळद, मुलतानी माती, गोरूचा इ. नैसर्गिक रंगाचा वापर मुलांनी केला.या प्रदर्शनाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्ह्याचे माध्यमिक उपशिक्षणाधिकारी बी. डी.टोणपे यांच्या हस्ते झाले.
 यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना पर्यावरणपूरक गणेश उत्सवाचे महत्व सांगितले. बालगोपाळानी तयार केलेल्या गणपतीच्या इको फ्रेंडली मूर्त्यांची पहाणी करून प्रत्येकाशी सवांद साधला .
विद्यालयाचे  उपक्रमशिल अध्यापक संजय साबळे म्हणाले की ' अशा उपक्रमातून विद्यार्थ्याना पर्यावरणाची जाणीव करून . देऊन त्यांचा सहभाग वाढविणे काळाची गरज आहे. प्रत्यक्ष कृतीतून घेतलेले शिक्षण चिरंतर टिकते. '
दि न्यू इंग्लिश स्कूलने पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून राबवलेल्या या पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्वत्र  कौतुक होत आहे. 
या उपक्रमासाठी आर.पी. पाटील,बी.आर.चिगरे, व्ही.के. गावडे, टी. एस. चांदेकर, एम.व्ही.कानूरकर, टी. टी. बेरडे,एस.जी. साबळे, डी.जी. पाटील, एस.जे. शिंदे, टी.व्ही. खंदाळे, विद्या शिंदे, जे.जी. पाटील, वर्षा पाटील यांनी परिश्रम घेतले.




No comments:

Post a Comment