टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत विराट सेना 2007 ची पुनरावृत्ती करणार! - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2021

टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत विराट सेना 2007 ची पुनरावृत्ती करणार! ऑनलाइन वृत्तसेवा

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर 2021 दरम्यान संयुक्त अरब अमिरात व ओमान या आखाती देशात रंगणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने निवडलेला भारतीय संघ पुढीलप्रमाणे- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, ईशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, वरूण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी राखीव खेळाडू म्हणून श्रेयश अय्यर, शार्दुल ठाकुर, दीपक चहर.
  संघातून अनुभवी शिखर धवन, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांना वगळून सुर्यकुमार यादव, ईशान किशन, राहुल चहर, वरून चक्रवर्ती यांना संधी देण्यात आली आहे. अलीकडच्या काळातील चांगल्या कामगिरी मुळे आर अश्विन व शार्दुल ठाकूर संघात जागा मिळवण्यात यशस्वी झाले.

 *2007 च्या विजयाची पुनरावृत्ती होणार!* 
2007 च्या टी-20 वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या अभूतपूर्व खेळाने क्रिकेट विश्वाला अचंबित केलेल्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक आहे.  विश्वचषक आणण्यासाठी सक्षम  विराट सेना धोनीच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा तशीच ऐतिहासिक कामगिरी करणार असा विश्वास भारतीय क्रिकेट शौकीन बाळगून आहेत. पाकिस्तान विरुद्ध 24 ऑक्टोबर रोजी पहिल्या सामन्यात विजयाचे सीमोल्लंघन करून विश्वचषकाच्या ट्रॉफी सह दिवाळी साजरी करण्याची संधी विराट सेनेने देशवासीयांना द्यावी यासाठी सी एल न्यूज कडून त्यांना हार्दिक शुभेच्छा!

या वल्डकप मधील भारताच्या लढती :- 24 ऑक्टोबर- पाकिस्तान, 31 ऑक्टोबर- न्युझीलँड, 3 नोव्हेंबर- अफगानिस्तान, 5 नोव्हेंबर- क्वालिफायर संघ, 8 नोव्हेंबर- क्वालिफायर संघ. अशा आहेत.No comments:

Post a Comment