संत गजानन आयुर्वेदाचा सर्वोत्कृष्ट निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2021

संत गजानन आयुर्वेदाचा सर्वोत्कृष्ट निकाल

चंदगड / प्रतिनिधी
      महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या वतीने जुन 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी  चमकदार कामगिरी करत सर्वोत्कृष्ट निकाल लावला आहे. यामध्ये द्वितीय वर्षाचा 84 टक्के निकाल लागला असून  अनुराधा स्वामी 72.56 पुष्पांजली हांडे 72.48 सोनाली हसबे 72.08 गुण मिळवून  अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तसेच प्रथम वर्षाचा 77 टक्के निकाल लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे व शिक्षकांचे मार्गदर्शन मिळाले. संस्थाध्यक्ष ॲड. आण्णासाहेब चव्हाण, विश्वस्त डॉ. यशवंत चव्हाण, डॉ. संजय चव्हाण यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment