किणी ग्रामपंचायतीच्या नियमबाहय कामाविरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

09 September 2021

किणी ग्रामपंचायतीच्या नियमबाहय कामाविरोधात गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारतेऊरवाडी / सी .एल. वृत्तसेवा

          किणी (ता. चंदगड) येथे कोणालाही विश्वासात न घेता बेकायदेशीर कामे चालू आहेत. नियमबाह्य कामांची चौकशी करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रविण गणाचारी यानी चंदगड गटविकास अधिकाऱ्याकडे एका निवेदनद्वारे केली आहे.

        दिनांक 12/08/2021 रोजी आर. सी. सी. रस्ता केलेला असून त्या कामा संदर्भात कोणतीही जाहीरात किंवा निविदा न मागविता कामकाज केलेले आहे. मनमानी निविदा न मागविता एखाद्या व्यक्तीला काम देणे किंवा आपल्या मर्जीतील व्यक्तीला टेंडर देणे हे बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीने किणी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून आधी काम करायचे व नंतर तांत्रिक व कागदोपत्री पुर्तता करायची अशी उलट पद्धत चालू केलेली आहे. तसेच मागासवर्गीय वस्तीत काम करताना मागासवर्गीय सदस्यांना न विचारता मनमानी व कमी दर्जाचे आर.सी‌. सी.गटर केलेले आहे. अशा पद्धतीच्या बेकायदेशीर कामांची चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गटविकास अधिकारी, चंदगड यांचेकडे अर्जाद्वारे सामाजिक कार्यकर्ते प्रविण गणाचारी यांनी केली आहे.No comments:

Post a Comment