![]() |
चंदगड येथील चंदगड अर्बन बॅकेत विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांचा सत्कार करताना अध्यक्ष दयानंद काणेकर, उपाध्यक्ष बाबूराव हळदणकर, बाजूला सचिन बल्लाळ, राजेंद्र परीट आदी |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अनेक अडचणींवर मात करून चंदगड अर्बन बॅकेने आपली आर्थिक स्थिती सुधारली आहे. यासाठी संचालक मंडळाने घेतलेल्या काटकसरीच्या निर्णयामूळे आज बॅकेमध्थे ७६ कोटीच्या ठेवी जमा आहेत,बॅकीग क्षेत्रातील बदल आत्मसात करून त्याचा वापर सभासदांसठी करावा, लहान कर्जे वाटपाचे प्रमाण वाढवावे, सभासद व कर्मचाऱी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करून २०२२ पर्यत बँकेने शंभर कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण करावा असे प्रतिपादन विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी केले. ते चंदगड येथील अर्बन बॅकेला दिलेल्या सदिच्छ भेटीवेळी बोलत होते.
प्रारंभी स्वागत अध्यक्ष दयानंद काणेकर यानी करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर केला. सीईओ चौगुले यानी संस्थेची सांपत्तिक स्थितीची माहिती दिली.
यावेळी तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षक प्रा. संभाजी जाधव, सहकारी अधिकारी डॉ मच्छिंद्र मुरूडकर, उपाध्यक्ष बाबूराव हळदणकर, जि. प. सदस्य, सचिन बल्लाळ, राजेंद्र परीट, संजय ढेरे, विठ्ठल गोंधळी, विनायक पिळणकर, चेतन देशपांडे, सलीम नाईक, शिवाजी पाऊसकर उपस्थित होते. आभार नौशाद मुल्ला यांनी मानले.
No comments:
Post a Comment