जागतिक बांबू दिवस निमित्त कार्यशाळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

19 September 2021

जागतिक बांबू दिवस निमित्त कार्यशाळा संपन्न

 

जागतिक बांबू दिवस निमित्त कार्यशाळा घेण्यात आली.

आजरा प्रतिनिधी/पुंडलिक सुतार
      महाराष्ट्र शासन ,वनवृत्त कोल्हापूर, कोल्हापूर वनविभाग, महाराष्ट्र बांबू विकास मंडळ नागपूर व हिरण्यकेशी बांबू शेतकरी उत्पादक संस्था पेरणोली (ता. आजरा) यांच्या संयुक्त विद्यमाने बांबू क्षेत्राचा सर्वंकष विकास कार्यशाळेचे आयोजन आजरा येथे  दि. 18सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले होते .या कार्यशाळेचे उद्घाटन आमदार  प्रकाश आबिटकर राधानगरी भुदरगड मतदारसंघ व श्रीमती ज्योत्स्ना चराटी नगराध्यक्ष, नगरपंचायत आजरा यांच्या हस्ते बांबू रोपाचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी  अजित द.भोसले समन्वयक ,महाराष्ट्र बांबू विकास मंडळ कोल्हापूर विभाग हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  रणजीत कालेकर वार्ताहर  व सदस्य हिरण्यकेशी बांबू शेतकरी मंडळ पेरणोली यांनी केले यावेळी उद्घाटनपर भाषणात बांबू क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे उद्गार  आमदारांनी काढले .यावेळी     आर.आर.काळेसाहेब उपवनसंरक्षक प्रा कोल्हापूर व श्री  नारणवर ,उपवनसंरक्षक सावंतवाडी, सिंधुदुर्ग,श्रीमती भाग्यश्री पवार फरांदे  उपविभागीय कृषी अधिकारी  के. एम. मोमीन तालुका कृषी अधिकारी  उपस्थित होते .
आपल्या अध्यक्षीय भाषणात  अजित भोसले साहेबांनी बांबू लागवड खत व पाणी व्यवस्थापन बांबू तोडणे बांबू प्रक्रिया प्रकल्प संधी व वाव याविषयी मार्गदर्शन केले .या प्रथम सत्राचे स्वागत  स्मिता डाके वनपरिक्षेत्र अधिकारी आजरा,तर आभार  .एन.एस.कांबळे साहेब सहाय्यक वनसंरक्षक खाकूतो व वन्यजीव ,कोल्हापूर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या दुपार चर्चासत्रामध्ये सतीश कांबळे यांनी बांबू चारकोल, बांबू डेपो ,बांबू हस्तकला वस्तू निर्मिती यासंबंधी मार्गदर्शन केले तर श्री प्रवीण सोनवले पर्यावरणीय सभ्यता विकास संस्था सातारा यांनी बांबू टूलकिट डिझाईन बांबू स्ट्रक्चर मधील कार्यानुभव याविषयी माहिती दिली तर श्रीमती भाग्यश्री पवार फरांदे उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज यांनी मनरेगाअंतर्गत शेत जमीन बांबू लागवड विषयी मार्गदर्शन केले. त्याच बरोबर अरविंद कल्याणकर शाहूवाडी यांनी बांबू लागवड मशागतीचे तंत्र आपल्या सहज सोप्या भाषेत दिले. दुपारी भोजनानंतर  अभिजीत गानू देवरुख, रत्नागिरी यांनी बांबू कलाकृतीचे सादरीकरण केले, तर श्रीमती संगीता वडे कोल्हापूर यांनी बांबू कलाकृती व वस्तूचे प्रात्यक्षिक करून दाखवले .त्याचबरोबर डॉ. अजय राणे असोसिएटेड डीन ,वानिकी महाविद्यालय, दापोली यांनी ऑनलाइन पद्धतीने माणसा, मेस बांबू रोपनिर्मिती अगरबत्ती कांडी उत्पादन कार्यानुभव व निष्कर्ष यासंबंधी मार्गदर्शन केले. शेवटी कोल्हापूर वनवृत्तातील चंदगड, भुदरगड, शाहूवाडी ,संगमेश्वर, खेड ,कुडाळ बांबू क्लस्टर मधील शेतकरी ,नोंदणीकृत संस्था पदाधिकाऱ्यांचे मनोगत घेण्यात आले त्याच बरोबर प्रश्नोत्तरांमध्ये अजित भोसले यांनी व  आर. आर. काळे साहेबांनी सर्व बांबू उत्पादक शेतकरी बांधवांना समर्पक उत्तरे दिली.यावेळी बांबू कलाकृती व वस्तूचे प्रदर्शन मांडले होते. 
या कार्यक्रमाचे नियोजन  बालेश न्हावी (वनपाल ) कृष्णा डेळेकर (वनरक्षक ) व रेंज स्टाफ तसेच हिरण्यकेशी बांबू शेतकरी उत्पादक संस्थेचे अध्यक्ष  कृष्णा वरेकर व सचिव सतीश कांबळे यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतराम दादू केसरकर व आभार  स्मिता डाके मॅडम, वनपरिक्षेत्र अधिकारी ,आजरा यांनी केले.


No comments:

Post a Comment