राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना जिल्हाध्यक्ष ए .वाय. पाटील , सोबत आमदार राजेश पाटील व मान्यवर |
तेऊरवाडी / एस. के. पाटील
अच्छे दिनचा नारा देवून केंद्र सरकारने सर्वांची फसवणूक केली आहे. पण आघाडी सरकारने नव्या योजना आणून विकास साधला आहे.
कोरोणाच्या या संकटातही चंदगड मतदार संघाचे आमदार राजेश पाटील यानी अतिशय चांगले काम केले आहे. सतत कामात असणाऱ्या राजेश पाटील यानी अत्यंत हूशारीने १७० कोटींची विकास कामे या मतदार संघात खेचून आणली असल्याने विकास कसा करायचा ? हे राजेश पाटील यांचेकडून शिकून घ्यावे , असे विचार कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष ए .वाय. पाटील यानी व्यक्त केले.
चंदगड विधानसभा राष्ट्रवादी कॉग्रेस कार्यकर्त्याचा मेळावा शिनोळी (ता. चंदगड) येथे आयोजित केला होता. यावेळी ए .वाय. पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाटील होते.
चदगड तालूक्याचा कोणताही प्रश्न सोडवला जाईल. सध्या चंदगडचा
विकास कागलच्याही पुढे चाललाय पण पक्ष वाढीसाठी वॉर्डा _ वार्डात ब्लॉक स्थापन करण्याचे आवाहन ए .वाय. पाटील यानी केले .आमदार राजेश पाटील बोलाताना म्हणाले, ``ज्या शरद पवारानी राष्ट्रवादी स्थापन केली व स्थापनेसाठी स्व .नरसिंगराव पाटील यानी मदत केली त्यांचा वारसच राष्ट्रवादीकडून मतदास संघाचे नेतृत्व करत आहे .५६ आमदावर असतानाही सत्ताधारी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याची किमया शरद पवारांनी केली . शरद पवार साहेबामुळेच चंदगड सुजलाम सुफलाम् झाला आहे . माहिलांना आरक्षण देण्याचे काम शरद पवारांनीच केले . अजित पवारांकडून चंदगडला नगर पंचायतीला १० कोटी निधी मिळाला आहे . तर आरोग्य मंत्र्यांनी हलकर्णी येथे ४ एकर जागा ५० कॉटच्या ट्रामा सेंटर मंजूर केली आहे .१७ कोटी रुपये बंधारा दूरूस्तीसाठी मंजूर झाले असून शिवाजी विद्यापिठ उपकेंद्र शिनोळीला मंजूर झाले आहे . राष्ट्रवादीकडून ३५० पैकी २७५ गावात कामे चालू आहेत . गोकूळच्या निवडणूकीत संकृती गहाण ठेवली गेली आहे का ?
या मतदारसंघात सर्वच उमेदवार पराभूत झाल्याने याचे चिंतन करणे गरजेचे असून आगामी काळात राष्ट्रवादीचा हा मतदारसंघ मजबूत करणार असल्याचे आमदार श्री पाटील यानी व्यक्त केले .
यावेळी तानाजी वाघमारे, अनिल साळोखे (जिल्हा कार्याध्यक्ष), वसंत जोशिलकर, पाटील, बाळू चौगुले, भिकू गावडे (चंदगड रा. अध्यक्ष) आदिनी मनोगते व्यक्त केली. एकरी ९० टन ऊस उत्पादन घेतल्याबद्दल महादेव नेवगिरे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या सर्व विभागाचे जिल्हाध्यक्ष, चंदगड तालूक्यातीत कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रास्ताविक शिवानंद हूंबरवाडी यांनी केले. सुत्रसंचालन एम. के. पाटील यांनी केले तर आभार शिवाजी पाटील यानी मानले.
No comments:
Post a Comment