ध्येय निश्चित असेल तर यश नक्की मिळते - प्रा. जॉर्ज क्रूझ, हलकर्णी महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2021

ध्येय निश्चित असेल तर यश नक्की मिळते - प्रा. जॉर्ज क्रूझ, हलकर्णी महाविद्यालयात स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन



चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर शालेय जीवनापासून ध्येय निश्चित करा आणि झपाटून अभ्यास करा,भरपूर वाचन करा, समाजाचे निरीक्षण करा आणि पहिल्यांदा एक उत्तम माणूस म्हणून जागा. स्पर्धा परीक्षेतुन भरपुर शासकीय रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळते असे प्रतिपादन प्रा. जॉर्ज क्रूझ यांनी केले. ते हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात स्पर्धापरीक्षेबाबत घेण्यात आलेल्या ऑनलाईन  मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला दौलत विश्वस्त संस्थेचे जेष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य पी. ए. पाटील, प्रा. आय. आर. जरळी उपस्थित होते.

            प्रारंभी स्पर्धा परीक्षा प्रमुख प्रा. एस. एन.पाटील यांनी  प्रास्ताविक व हेतू स्पष्ट केला. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील  प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या वेबिनारला  प्रा. टी. एम. वांद्रे यांनी तांत्रिक सहाय्य केले. सूत्रसंचालन प्रा. नंदकुमार पाटील यांनी केले. तर आभार प्रा. अंकुश नौकुडकर यांनी मानले.

No comments:

Post a Comment