चंदगड येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बस थांब्याचे उद्घाटन - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2021

चंदगड येथे आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते बस थांब्याचे उद्घाटन

'चंदगड येथील नुतन प्रवासी बसथांब्याचे उद्घाटन करताना आम.राजेश पाटील, नगराध्यक्षा प्राची काणेकर, बाजुला पं स.सदस्य दयानंद काणेकर

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         चंदगड नगरपंचायत आणि आई आबा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजी महाराज चौक येथे बांधण्यात आलेल्या प्रवासी बसथांंब्याचे उद्घाटन आमदार राजेश पाटील, नगराध्यक्षा प्राची काणेकर, पंचायत समिती सदस्य दयानंद काणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अभिजित जगताप, राजेंद्र परीट, बाळासाहेब घोडके, अल्ली मुल्ला, अशोक दाणी, शकील नेसरीकर, प्रमोद कांबळे, शिवानंद हुंबरवाडी आदीसह सर्व नगरसेवक, ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments:

Post a Comment