आगार व्यवस्थापक निकम यांचा सत्कार, कशाबद्दल, वाचा............ - चंदगड लाईव्ह न्युज

04 September 2021

आगार व्यवस्थापक निकम यांचा सत्कार, कशाबद्दल, वाचा............

चंदगड आगार व्यवस्थापक ए .आर. निकम यांचा सत्कार करताना श्रीकांत नेवगे, शिवदत्त कोट आदी 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        कोरोना काळात एसटी तोट्यात असुन सुद्धा तालुक्यातील वाडी वस्तीवर बसेस चालू करून सहकार्य केल्याबद्दल चंदगड आगार प्रमुख ए. आर. निकम यांचा प्रवाशांकडून सत्कार करण्यात आला. निकम यांनी विद्यार्थ्यांसाठी शिरोली, सत्तेवाडी, अलबादेवी मार्गे नेसरी गाडी, पारगड मुक्काम गाडी सूरू  केली. अपुरे कर्मचारी आणि कोरोनामुळे पुरेसे भारमान नसताना सुद्धा त्यांनी प्रवाशांचे हित विचारात घेऊन सेवा दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत नेवगे व शिवदत्त कोट यांनी यांचा सत्कार केला. हा सत्कार आपल्या एकट्याचा नसून एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांचा असल्याचे निकम यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील, सचिन मुंडे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment