माणगाव येथे उघड्यावर पडलेल्या विसर्जित गणेश मूर्तींचे तरुणांकडून पुन्हा विसर्जन - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2021

माणगाव येथे उघड्यावर पडलेल्या विसर्जित गणेश मूर्तींचे तरुणांकडून पुन्हा विसर्जन

माणगांव येथील नदिपात्रात उघड्यावर पडलेल्या मुर्त्या पुन्हा विसर्जीत करताना जयवंत सुरूतकर, जयवंत कांबळे

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

         माणगाव (ता. चंदगड) येथील ताम्रपर्णी नदित विसर्जित केलेल्या गणेश मूर्त्या पाणी पातळी कमी झाल्याने उघडयावर पडलेल्या होत्या .पण माणगाव  येथील कार्यकर्त्याकडून या सर्व  गणेश मूर्तीचे पून्हा नदिमध्ये विसर्जन करण्यात आल्याने गणेश मूर्तींची होणारी विटंबना टळली.

        येथील नदिपात्रात गणेश विसर्जन केले गेले. यानंतर जवळपास सर्वच गणेश मुर्त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या असल्याने पाण्यावर तरंगत काठावर आल्या. हे विदारक दृष्य माणगाव येथील तंटामुक्त अध्यक्ष जयवंत सुरूतकर, सामाजिक कार्यकर्ते जयवंत कांबळे, यल्लाप्पा कांबळे, उत्तम सुरूतकर, रामू गोडसे, विकास कांबळे, राजेंद्र नार्वेकर याना  दिसले. तात्काळ या सर्वानी या नादिपात्रात उतरून या सर्व मुर्त्या पुन्हा खोल पाण्यात विसर्जित केल्या. या सर्व कार्यकर्त्याचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

No comments:

Post a Comment