चंदगड येथे महाविकास आघाडीतर्फे किरीट सोमय्या यांचा निषेध - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2021

चंदगड येथे महाविकास आघाडीतर्फे किरीट सोमय्या यांचा निषेध

चंदगड येथे भाजप नेते किरीट सोमय्या यांचा निषेध करताना महाविकास आघाडीचे पदाधिकारी


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

            ग्रामविकास तथा कामगार मंत्री  हसन मुश्रीफ यांच्या वरती 127 कोटी चा मनी लोडिंग असा आरोप करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आज चंदगड येथे छत्रपती संभाजी महाराज चौकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व महा विकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला._

     यावेळी चंदगडनगर पंचायतीचे स्वीकृत नगरसेवक  शिवानंद हुंबरवाडी यांनी  सत्तेविना वैफल्य ग्रस्त झालेले भाजपाचे राज्याध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी असे खोटे आरोप करून चारित्र्यसंपन्न नेत्यांची बदनामी करण्याचे कट-कारस्थान थांबवावे असे मत व्यक्त केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भिकु गावडे यांनी मंत्री छगन भुजबळ  यांच्यावर अशाच पद्धतीने खोटे आरोप करून त्यांची बदनामी केली पण न्यायालयाने त्यांना दोषमुक्त करून अशा पद्धतीने चाललेल्या घाणेरड्या राजकारणाचा बुरखा फाडला त्यामुळे मंत्री मुश्रीफ  अशा शंभर किरीट सोमय्याना पुरुन उरतील असे मत व्यक्त केले.राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी महा विकास आघाडीचे चाललेले जनहिताचे काम भाजपला बगवत नसून महाविकासआघाडी ला बदनाम करण्याचा एककलमी कार्यक्रम भाजप नेत्यांकडून चालू आहे.या वेळी जोडे मारून निषेध व्यक्त केला.

      यावेळी चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला,प स सदस्य दयानंद काणेकर,तालुका संघाचे संचालक तानाजी गडकरी, बाळू चौगुले ,परशुराम पाटील, महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष संगीता पाटील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष प्रवीण वाटंगी, विष्णू पाटील, राजेंद्र परीट, आलीसो मुल्ला, प्रमोद कांबळे ,अमित चिटणीस, विठ्ठल गावडे, जॉन लोबो, सत्तार मोहम्मद शहा,आदीसह नगरसेवक  कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment