हलकर्णी फाटा येथे ओकीनावा इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2021

हलकर्णी फाटा येथे ओकीनावा इलेक्ट्रिक दुचाकी शोरूमचा शुभारंभ

 

हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथे ओकीनावा दुचाकी शोरूम च्या शुभारंभ प्रसंगी मारुती बन्ने, शांताराम पाटील,आर. जी पाटील, राहूल पाटील, पी. डी. पाटील,वैशाली खांडेकर, युवराज पाटील,डॉ विश्वनाथ पाटील आदी.

चंदगड /प्रतिनिधी  (नंदकुमार ढेरे) 
 सध्याच्या काळात  पेट्रोलचे वाढते  भाव आणि प्रदूषण यावर उत्तम पर्याय आणि तालुक्यात ग्राहकांच्या पंसतीचा वाढता कल ओळखून शांताराम युवराज पाटील यांनी  हलकर्णी फाटा येथे ए. एस. मोटर्स ओकीनावा या कंपनीच्या दुचाकीचा  शुभारंभ करून दुचाकी चालकांना पेट्रोल वर उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे.  
       या शोरूमचा शुभारंभ  कंपनी डीलर मारुती बन्ने माजी सभापती शांताराम पाटील,सरपंच आर. जी पाटील,सरपंच राहूल पाटील, सरपंच पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येते ओकीनावा दुचाकी शोरूम च्या शुभारंभ प्रसंगी ओकीनावा या इलेक्ट्रिक गाडीवरून फेरफटका मारताना सरपंच राहूल गावडा व माजी सभापती शांताराम पाटील 

            यावेळी माजी सभापती शांताराम पाटील म्हणाले  वाढते प्रदूषण रोखण्यासाठी इलेक्ट्रिक बाईक हा उत्तम पर्याय आहे. दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत आहेत. पेट्रोल आणि गाडीचा अतिरिक्त खर्च हा सामान्य माणसाला न परवढणारा आहे. त्यामुळे वाहन चालकांनी इलेक्ट्रिक बाईक वापरावी असे आवाहन केले. तर दुचाकी विक्रेते शांताराम पाटील म्हणाले ओकीनावा या कंपनीच्या दुचाकी या कमीत कमी मेंटनन्स व चालवण्यास आरामदायी आहेत. यामध्ये *टॉप मॉडेल सिंगल चार्जला १३९ कि. मी. गाडी धावते,डबल डिस्क, रीमुव्हेंबल बॅटरीची सोय,अँटी थिप सिस्टिम, की लेस फंक्शन, व शासनाची सबीसीडी*, यासह ग्राहकांना विविध पत पुरवठा संस्था व बँकाचे  अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाणार असल्याने बुकींग सुरू असून ग्राहकानी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले.
       यावेळी डॉ. विश्वनाथ पाटील, बाळू पाटील, वैशाली खांडेकर, युवराज पाटील,भैरू पाटील, शिवाजी कागणकर, नंदू कोकितकर, तातोबा पाटील, धाकु गावडे, संतू पाटील, नारायण पाटील, अशोक पाटील, उत्तम पाटील, उदय पाटील, रमेश गावडे ,पांडुरंग कोकितकर, उत्तम कागणकर, सतीश कागणकर आदी उपस्थित होते.






No comments:

Post a Comment