हलकर्णी येथील श्री ग्रामदैवत गणेश मंडळ व कै. केदारी रेडेकर हॅास्पीटल गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2021

हलकर्णी येथील श्री ग्रामदैवत गणेश मंडळ व कै. केदारी रेडेकर हॅास्पीटल गडहिंग्लज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजनचंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         हलकर्णी (ता. चंदगड) येथील श्री ग्रामदैवत सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व कै. केदारी रेडेकर हॉस्पिटल गडहिंग्लज यांच्यामार्फत शनिवार दि. १८/०९२०२१ रोजी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालय हलकर्णी येथे  रक्तदान शिबीर आयोजीत केलेले आहे. या रक्तदान शिबिराचे उद्घघाटन शिवसेना संघटक संग्राम कुपेकर व कै. केदारी रेडेकर हॉस्पिटलचे अनिरूध्द रेडेकर यांच्या शुभहस्ते होणार आहे. 

          गावातील व परिसरातील सर्व तरूण मित्रांनी रक्तदान शिबीरामध्ये भाग घ्यावा असे आवाहण मंडळाचे अध्यक्ष जोतिबा सांवत यांनी केले आहे. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य भरमाण्णा गावडा, शिवाजीराव सांवत, सरपंच राहुल गावडे, उपसरपंच विष्णु सुतार व सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. यावेळी कोरोना लस घेवुन १५ दिवस झालेल्यांना ही रक्तदान करता येईल.No comments:

Post a Comment