आल्याचीवाडी खून प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करावे, या मागणीसाठी परिट समाजाच्या वतीने निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

17 September 2021

आल्याचीवाडी खून प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करावे, या मागणीसाठी परिट समाजाच्या वतीने निवेदन

 

खून प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करावे. या मागणीचे निवेदन आजरा पोलिस निरिक्षकांना देताना परीट समाजबांधव.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        आल्याचीवाडी (ता. आजरा) येथील लता परीट खून प्रकरणातील आरोपीला कठोर शासन करावे. यासाठी आजरा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनील हारगुडे यांना परिट समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. 

       निवेदन देताना कोल्हापूर जिल्हा परीट समाजा चे जिल्हा उपाध्यक्ष पंकज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट, जिल्हा संचालक शशिकांत परीट, नगरसेवक उदय परीट, जिल्हा सल्लागार दशरथ यादव, अशोक शिंदे, गडहिंग्लज तालुका अध्यक्ष रामचंद्र परीट, चंदगड तालुका अध्यक्ष मनोज परीट, आजरा तालुका अध्यक्ष भिकाजी परीट, उपाध्यक्ष शिवाजी  परीट, विलास परीट, बाबुराव परीट, शिवाजी परीट, दयानंद परीट, अशोक भालेकर, संजय भालेकर, बाळू बांदेकर, राजू परीट व इतर परीट समाज बांधव उपस्थित होते. No comments:

Post a Comment