ज्येष्ठ समाजसेवक व गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन ॲवार्ड ने सन्मानित, डुक्‍करवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2021

ज्येष्ठ समाजसेवक व गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन ॲवार्ड ने सन्मानित, डुक्‍करवाडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

             

प्रभाकर तुकाराम कांबळे यांना सन्मानपत्र देताना मान्यवर.

माणगाव (प्रतिनिधी) 

विक्रोळी येथील ज्येष्ठ समाजसेवक व गुणवंत कामगार वनिता फाऊंडेशनचे संस्थापक  महाराष्ट्र रत्न प्रभाकर तुकाराम कांबळे यांच्या समाजकार्याची दखल खारघर नवी मुंबई येथील कलासाधना सामाजिक संस्था संचालित ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ने घेऊन सन  2021 चा "आंतरराष्ट्रीय ग्लोबल गोल्ड आयकॉन ॲवार्ड   झी टीव्हीच्या वरिष्ठ पत्रकार अनुपमा खानविलकर शितोळे व विधान परिषद सदस्य व शिक्षक आमदार बाळाराम पाटील, पुणे शिक्षण आयुक्त एस बी माळी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र ,गोल्ड मेडल व रॉबर्ट टी कियोसकी यांचे प्रत्येक व्यक्तीला आर्थिक सल्ला देणारे रिच डॅड पुअर डॅड देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम महाजन होते.

    कलासाधना सामाजिक संस्थेच्या वतीने खारघर येथील थ्री स्टार हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्याहस्ते झाल्यानंतर मान्यवर पाहुण्यांचे स्वागत सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले असून शिक्षक दिनाचे औचित्य साधून ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड च्या वतीने सण 2021  चे ग्लोबल

 गोल्ड आयकॉन टीचर्स ॲवार्ड व ग्लोबल गोल्ड आयकॉन ॲवार्ड या आंतरराष्ट्रीय ॲवाड चा वितरण कार्यक्रम संपन्न झाला .त्यावेळी गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांनाही सन्मानित करण्यात आले असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .

  महाराष्ट्राच्या जडणघडणीत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा आयकॉन ॲवार्ड  व  .शिक्षकांचा टीचर अवॉर्ड  ने मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष श्रीराम महाजन तर सूत्रसंचालन मनीष कापसे यांनी केले. प्रमुख मान्यवर शिक्षक आमदार बाळाराम पाटील . झी टी व्हीच्या वरिष्ठ पत्रकार अनुपमा खानविलकर शितोळे यांनी मार्गदर्शन केले असून काही पुरस्कार प्राप्त व्यक्तीनी आपण करत असलेल्या कार्याची माहिती सांगून सर्वांची मने जिंकली. शेवटी सर्वांचे आभार संस्थेच्या अध्यक्ष मेघा महाजन यांनी मानले.

     लंडन येथे आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त "भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी ,व वनिता फाऊंडेशनचे संस्थापक गुणवंत कामगार प्रभाकर तुकाराम कांबळे हे एक अष्टपैलू व्यक्तीमत्त्व असून सर्वांना बरोबर घेऊन जाणारे सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कार्य करणारे सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा साहित्य सहकार कामगार आरोग्य व पत्रकारिता अनेक वर्ष झोकून देऊन महाराष्ट्र शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रत्यक्ष कृतीच्या तसेच वृत्तपत्राच्या माध्यमातून शासन दरबारी तळागाळातील सर्व सामान्य जनतेचे प्रश्न पोहोचविण्याचे महान कार्य सतत करत आहेत.


सामाजिक शैक्षणिक कामगार सहकार संबंधी परिवर्तनवादी स्तंभलेखन करून जनतेला जागे करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करत आहेत.    समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन समाज परिवर्तन घडवत आहेत.

   सन 2013 चा महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा महाराष्ट्र शासनाचा  "गुणवंत कामगार पुरस्कार "  अनेक संस्था संघटनेकडून राज्यस्तरीय व  आंतरराष्ट्रीय दोनशेहून अधिक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.

   प्रभाकर कांबळे हे चंदगड तालुक्यातील डुक्‍करवाडी गावचे सुपुत्र असून ते  सामाजिक, शैक्षणिक ,कामगार. व सहकारी संस्था संघटनेच्या कार्यकारी मंडळावर काम करीत आहेत त्यांचे सामाजिक कला सांस्कृतिक साहित्य आरोग्य कामगार सहकार व पत्रकारिता क्षेत्राशी जवळचे नाते असून मुंबईच्या झोपडपट्टी भागात राहून पत्नीच्या नावाने "वनिता फाउंडेशन  या सामाजिक संस्थेची स्थापना करून " मानव सेवा हीच ईश्वर सेवा " मानून समाज कार्य सुरू केले .आहे  त्यांच्या कार्याची दखल ग्लोबल गोल्ड टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड ने घेऊन त्यांना समाज सेवेसाठी ग्लोबल गोड आयकॉन पुरस्कारा या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांचे वनिता फाउंडेशनचे अध्यक्षा वनिता कांबळे कार्याध्यक्ष सुनील निकाळे  संतोष गुप्ता  सुरेश पवार  सुरज भोईर  राजेंद्र कांबळे  आदी मान्यवरांनी तसेच सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



No comments:

Post a Comment