रवळनाथने अडीच हजारवर सभासदांना "घरपण" दिले - उपनिबंधक अरूण काकडे, चंदगड येथे सभासदांना प्रशिक्षण - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2021

रवळनाथने अडीच हजारवर सभासदांना "घरपण" दिले - उपनिबंधक अरूण काकडे, चंदगड येथे सभासदांना प्रशिक्षण

चंदगड येथे रवळनाथ को-ऑप हाऊसिंग फायनान्स संस्थे मार्फत आयोजित केलेल्या सभासद प्रशिक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विभागीय उपनिबंधक अरुण काकडे,बसलेले संस्थाध्यक्ष एम एल चौगुले, प्रा जाधव,डाॅ.मुरूडकर 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           सहकारातील सर्व मापदंड पूर्ण करत रवळनाथ को-ऑप हाऊसिंग फायनान्स ही संस्था सभासदांचे हित जोपासत अल्पावधीत सहकारातील माईलस्टोन ठरली आहे.अडीच हजार सभासदांना घरासाठी अर्थसहाय्य देऊन "घरपण" जपल्याचे प्रतिपादन विभागीय उपनिबंधक अरुण काकडे यांनी केले.

          श्री रवळनाथ को-ऑप हाऊसिंग फायनान्स सोसायटी, प्रधान कार्यालय गडहिंग्लज मार्फत चंदगड शाखा  परिसरातील संस्थेच्या सभासदाकरीता आयोजित  केलेल्या सभासद प्रशिक्षण कार्यशाळेत उद्घाटक व बीजभाषक या नात्याने बोलत होते.अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले होते.

चंदगड येथे रवळनाथ को-ऑप हाऊसिंग फायनान्स संस्थे मार्फत आयोजित केलेल्या सभासद प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन रोपाला पाणी घालून करताना विभागीय उपनिबंधक अरुण काकडे,बाजूला संस्थाध्यक्ष एम एल चौगुले, सौ.नेसरीकर, प्रा जाधव,डाॅ.मुरूडकर 


            प्रारंभी स्वागत चंदगड शाखा सल्लागार प्रा डॉ. आर.एन. साळुंके यानी केले. श्री. काकडे व  मान्यवरांच्या हस्ते श्री रवळनाथ  प्रतिमेचे पूजन व रोपास पाणी घालून कार्यक्रमाची सुरूवात झाली. 

यावेळी चौगुले यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत  आपले मनोगत व्यक्त केले. श्री. काकडे पुढे म्हणाले, ``सहकारात एखादी संस्था नावारूपास आणायाची असेल तर संचालक मंडळाने वाहून घेतले पाहिजे, संस्थापक अध्यक्ष एम एल चौगुले व संचालक मंडळाने घेतलेल्या कष्टामुळे रवळनाथ सोसायटी सहकारातील आदर्श ठरली.

              सहकारी अधिकारी डॉ.मच्छिंद्र मुरूडकर यानी कायदा व  वसुली या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करून कर्जप्रकरणात कर्ज घेणाऱ्या सभासद इतकाच जामीनदार ही जबाबदार असतो. सहकारातील वसूली ही संवादांतून होते, त्यासाठी संस्थेतील कर्मचाऱ्यांनीही सभासदांना वर्षभर सेवा दिली पाहीजे. तरच ग्राहक टिकतील असे सांगुन बॅकीग क्षेत्रात झालेले बदल रवळनाथ हाऊसिंग संस्थेने आत्मसात केल्यामुळेच आज ही संस्था सहकारात यशाच्या शिखरावर पोहचली आहे.

        यावेळी प्रा. संभाजी जाधव यानी  बहुराज्य सहकारी संस्था कायदा-२००२ कायद्यानुसार सभासदांचे कर्तव्ये,वसूली,आणि जबाबदारी या विषयावर  मार्गदर्शन करताना सहकारात सहकार्यापेक्षा शंकाच काढणारे जास्त लोक असतात, संस्थेच्या जडणघडणीत सभासदांचा असायला हवा,सभासदमूळे संस्थेच्या हिताला बाधा येता असे वर्तन असू नये. असे सांगून सहकारात आलेल्या पारदर्शकपणामुळे आता गडबड करणे अवघड झाल्याचे सांगितले. 

  यावेळी प्रशिक्षण कार्यशाळेत ८०  सभासद सहभागी झाले होते. यावेळी सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव, सेवानिवृत्त सभासदांचा सत्कार व सहभाग घेतलेल्या सभासदांना प्रमाणपत्राचे प्रातिनिधिक  वितरण करण्यात आले 

   सूत्रसंचालन संचालिका सौ. रेखा पोतदार यानी केले तर आभार चंदगड शाखा चेअरमन  सौ.पुष्पा नेसरीकर यांनी मानले.यावेळी  संचालक प्राचार्य डॉ. आर.एस. निळपणकर, सीईओ डी.के. मायदेव, शाखा सल्लागार नारायण काणेकर, प्रशासन अधिकारी सागर माने, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब मार्तंड,  शाखाधिकारी दीपक शिदे, एस व्ही गूरबे,आय के स्वामी,प्रा.एस एम पाटील, प्रा.एन एम मासाळ,शिवानंद वाली,संजय ढेरे,एस के सांवत,पी एल भादवणकर डाॅ.राजू घोरपडे,यासह चंदगड तालुक्यातील  सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment