धुमडेवाडी येथील कुलदैवत विकास सेवा संस्थेमार्फत सभासदांना आठ ट्कके लाभांशचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

08 September 2021

धुमडेवाडी येथील कुलदैवत विकास सेवा संस्थेमार्फत सभासदांना आठ ट्कके लाभांशचे वाटप

धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील कूलदैवत विकास सेवा संस्थेमार्फत सभासदांना लाभांश व ठेवीवर व्याज वाटप करतानाअध्यक्ष तथा सरपंच आर जी पाटील बाजूला सचिव शिवाजी पाटील, जोतिबा पाटील आदी

 

चंदगड / प्रतिनिधी

        धुमडेवाडी (ता. चंदगड) येथील कूलदैवत विकास सेवा संस्थेमार्फत सभासदांना ८% प्रमाणे लाभांश आणि ठेवीवर ८% व्याज अध्यक्ष तथा सरपंच आर. जी. पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. संस्था स्थापनेपासून आजतागायत सातत्याने सभासदांना गणेश चतुर्थीच्या सणाला लाभांश वाटप केला जातो. संस्थेला चालू वर्षी ६७५९४४ रुपये इतका नफा झाला आहे. पावसाळ्यात ऐन सणासुदीच्या काळात या निमित्ताने आर्थिक मदत केल्याची भावना सभासदांनी व्यक्त केली या वेळी उपाध्यक्ष तुकाराम सट्टूपा पाटील,संचालक जोतिबा गावडू पाटील, राणबा यल्लापा पाटील,जानबा लक्ष्मण पाटील,भैरू रवळू पाटील,सौ. शांताबाई जोतिबा पाटील,सौ. लताबाई विठ्ठल पाटील, सचिव शिवाजी पाटील, शंकर पाटील जोतिबा पाटील, धोंडीबा पाटील, गोविंद पाटील, युवराज पाटील, नरसु बाळू पाटील,यल्लापा पाटील,प्रकाश पाटील,बाळू पाटील आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment