वाटंगी येथे जि.प.सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते २० लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ सोहळा संपन्न - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2021

वाटंगी येथे जि.प.सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते २० लाखांच्या विकास कामांचा लोकार्पण व शुभारंभ सोहळा संपन्न

वाटंगी येथे जि.प.सदस्या सुनिता रेडेकर यांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

          जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनिताताई रमेशराव रेडेकर यांच्या फंडातून मंजूर केलेल्या वीस लाख रुपये विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शिवाजी नांदवडेकर होते. 

        प्रारंभी प्रास्ताविक शुभांगी पोवार यांनी केले. यावेळी "राष्ट्रीय पोषण आहाराचा" शुभारंभ सौ. रेडेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर स्मार्ट अंगणवाडीसाठी दीड लाखाचे साहित्य आणि नवीन अंगणवाडी इमारत (८.५लाख) लोकार्पण सोहळा पार पडला. वाटंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, दुरुस्तीच्या (१०लाख) कामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत वाटंगी, प्रा. आ. केंद्र वाटंगी, विद्या मंदिर वाटंगी व अंगणवाडी वाटंगी यांनी केले होते. राष्ट्रीय पोषण आहार शुभारंभाच्या निमित्ताने पालकांनी विविध पाककृतींचे आयोजन केले होते. त्याचबरोबर रांगोळी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. पाटणे, उपसरपंच मंगल वांद्रे, ग्रा. प. सदस्या इंदुबाई कुंभार, मिनाक्षी देसाई, स्वाती गुरव, अलका देसाई, पर्यवेक्षिका शुभांगी पोवार, वायस्कर, रवी देसाई, प्रकाश पाटील, बापु होडगे, युवराज जाधव, गोपाळ रेडेकर, सुनिल नांगरे यांसह ग्रामस्थ व वाटंगी बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस, वाटंगी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार संदीप पोवार यांनी मानले.
No comments:

Post a Comment