चंदगड तालुका आर्किटेक आणि इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा - चंदगड लाईव्ह न्युज

15 September 2021

चंदगड तालुका आर्किटेक आणि इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे अभियंता दिन साजरा

 

अभियंता दिनानिमित्य आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित चंदगड तालूक्यातील अभियंते

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
            अभियंता दिनानिमित्त 15 सप्टेंबर रोजी सर विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी मजरे  कार्वे येथे चंदगड तालुका आर्किटेक आणि इंजिनिअर्स असोसिएशन तर्फे अभियंता दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकर सलाम होते .
यावेळी कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अभियंता रजत हूलजी यांनी केले.  अभियंत्यांनी गुणवत्तापूर्वक कामे करावीत व देशाच्या विकासामध्ये हातभार लावावा असे प्रतिपादन दिनकर सलाम यांनी केले. तसेच बसवंत गडकरी ,अमित जाधव ,निहाल नाईक, रवी पाटील, सागर कोठावळे ,प्रशांत बसर्गेकर, प्रवीण पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली. यावेळी चंदगड तालुका आर्किटेक आणि इंजिनिअर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिनकर सलाम यांचा व उपाध्यक्षपदी बसवंत गडकरी तर सचिव पदी उदयकुमार पाटील त्यांची निवड झाल्याबद्दल  प्रशांत पोपकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला धनंजय निवगे,  प्रथमेश कोनो आदी उपस्थित होते. आभार उदयकुमार पाटील यांनी मानले.


No comments:

Post a Comment