अडकूरमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी करोना लसीकरण मोहीम - चंदगड लाईव्ह न्युज

16 September 2021

अडकूरमध्ये आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी करोना लसीकरण मोहीम



अडकूर / सी .एल. वृत्तसेवा

सध्याची करोनाची गंभिर स्थिती व कोरोणाची तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता सर्वांनी कोरोना लसीकरण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना लसीकरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. 

त्याचाच एक भाग म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर मार्फत अडकूर येथे शुक्रवार दि .१७ रोजी आरोग्य केंद्रात भव्य लसिकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. 

         त्याबरोबरच परिसरातील प्रत्येक गावांमध्येही पुढील पंधरा दिवसाच्या कालावधीत कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ अडकूर गावातून होणार आहे.यासाठी गावातील सर्व गणेश मंडळ सामाजिक संस्था सहकारी संस्था सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळे व दूध डेरी यांनी आपली सामाजिक बांधिलकी बांधिलकी जपून आपापल्या वार्ड प्रभागांमध्ये ज्या लोकांचे लसीकरण राहिलेले आहे असे वय वर्ष 18 वरील सर्व नागरिक ज्यांनी अजून पहिला डोस घेतलेला नाही व ज्यांनी पहिला डोस घेतलेला आहे व 84 दिवस पूर्ण झालेले आहेत अशांना दुसऱ्या डोसची माहिती देऊन अडकूर गाव 100% लसीकरण पूर्ण कामे करणेकामी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन वैद्यकिय अधिकारी डॉ .बी.डी. सोमजाळ यानी केले आहे. सदर लसीकरण शुक्रवार दिनांक 17 सप्टेंबर 2021 रोजी

प्राथमिक आरोग्य केंद्र अडकूर येथे होणार असून यासाठी अगोदर नोंदणीची गरज नाही . लसिकरणाला येताना फक्त आपले आधार कार्ड व मोबाईल नंबर माहित असने गरजेचे आहे . तरी पात्र व्यक्तिनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत अडकुर यांच्या वतीने करण्यात आले आहे.




फोटो -

आरोग्य केंद्र अडकूर


No comments:

Post a Comment