चंदगड मतदार संघातील एस. टी. च्या फेऱ्या सुरु करा - आमदार राजेश पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2021

चंदगड मतदार संघातील एस. टी. च्या फेऱ्या सुरु करा - आमदार राजेश पाटील

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

       आमदार राजेश पाटील यांनी एसटी महामंडळ कोल्हापूर डिव्हिजनचे अधिकारी पलंगे यांची भेट घेऊन  चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील  बंद पडलेल्या एसटीच्या फेऱ्या लवकरात लवकर सुरू करावी व तालुक्यातील विद्यार्थ्यांचे हाल  थांबवण्याची मागणी केली. 

        कोरोनाच्या काळात पूर्णपणे एसटी ची सेवा बंद होती.  तालुक्यातील नागरिकांचे हाल दिवसेंदिवस होत असल्या कारणाने वारंवार अधिकारी यांना सांगून सुद्धा दखल घेत जात नव्हती. त्यामुळे प्रत्यक्ष आमदार राजेश पाटील यांनी कोल्हापुरातील एसटी महामंडळाचे अधिकारी श्री पलंगे  यांची भेट घेतली व चंदगड व गडहिंग्लज आगार मध्येच एसटी बसेस यांची स्थिती चांगली नसून त्या वारंवार बंद अवस्थेत असतात. त्यामुळे नाहक नागरिकांचे गैरसोय होते. लवकरात लवकर चंदगड व गडहिंग्लज आगारला नवीन बसेस द्याव्यात अशी मागणीही यावेळी  केली.  डिव्हिजन कंट्रोलर श्री पलंगे यांनी चंदगड व गडहिंग्लज आगारला लवकरात लवकर नवीन बसेस देऊ असे सांगून  बंद पडलेले बसफेऱ्या या लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. 

No comments:

Post a Comment