कालकुंद्री येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन, धावपटूंसाठी सुवर्णसंधी - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2021

कालकुंद्री येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन, धावपटूंसाठी सुवर्णसंधी

मॅराथॉन स्पर्धा संग्रहित छायाचित्र


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कालकुंद्री (ता. चंदगड) येथील श्री कलमेश्वर स्पोर्ट्स क्लब च्या वतीने तीन गटात भव्य मॅराथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

     शनिवार दिनांक १६ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी स्टेडियम कालकुंद्री येथे स्पर्धांचे उद्घाटन होईल. खुला गट (अंतर ५ किलोमीटर), १६ वर्षाखालील मुले (अंतर ३ किलोमीटर), खुला गट मुली/महिला (अंतर २ किलोमीटर) अशा तीन गटात स्पर्धा होणार आहेत. प्रत्येक गटातील पहिल्या पाच स्पर्धकांना भव्य रोख बक्षिसे पुढील प्रमाणे- खुला गट मुले- ५००१, ३००१, २००१, १००१, ५०१ रुपये. १६ वर्षाखालील मुले- ३००१, २००१, १५०१, १००१, ५०१ रुपये. मुली/महिला खुला गट- २००१, १५०१, १००१, ७०१, ५०१ तसेच तीनही गटातील सर्व विजेत्यांना गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. इतक्या व्यापक प्रमाणात मॅराथॉन स्पर्धा होण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ असून हौशी उदयोन्मुख धावपटूंसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे.

           इच्छुक स्पर्धकांनी आपली नाव नोंदणी स्पर्धेआधी एक दिवस करावी, तीनही गटातील स्पर्धकांनी आपले आधार कार्ड सोबत आणावे अशी सूचना करण्यात आली असून नाव नोंदणीसाठी 9021742494/ 9604197114/ 9594427003/ 9022055134 या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करण्याचे आवाहन कलमेश्वर स्पोर्ट क्लब मार्फत करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment