सिमावासीयांना बेळगावचा चिमुकला सर्वमची मदतीसाठी आर्त हाक, उपचारासाठी १६ कोटींची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2021

सिमावासीयांना बेळगावचा चिमुकला सर्वमची मदतीसाठी आर्त हाक, उपचारासाठी १६ कोटींची गरज

 


तेऊरवाडी / एस. के. पाटील

बेळगावच्या चिमुकल्या सर्वमचे हास्य निघून गेले आहे. केवळ १५ महिण्यांच्या या शिवमला स्पायनल मस्कुलर एट्रोपी (SMA - 1 ) हा जगातील अत्यंत दुर्मिळ असा आजार झाला असून यासाठी १६ कोटी रुपयांचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. आपली छोटीशी मदत मिळाली तर आपण सर्वजन मिळून या सर्वमला. जगाला डोळे भरुन पाहण्याची , हसण्याची व बागडण्याची संधी उपलब्ध करून देवू शकतो. यासाठी सिमावासियानी या बालकाला शक्य होईल तेवढी मदत करणे गरजेचे आहे.

     गेली १५ महिने सर्वम या आजाराशी झुंझत आहे. पण या आजारावरील उपचार खर्च डोळे पांढरे करायला लावणारा आहे. केवळ लाखात नाही तर तब्बल १६ कोटी रूपयांचे Zolgensma हे इंजेक्शन सर्वमला सहा महिण्यांच्या आत देणे गरजेचे आहे. अन्यता सर्वमचा जिव धोक्यात आहे. आपल्या सर्वांची मदत लाखमोलाची ठरणार आहे. आपली छोटीशी मदत या लहान बाळाचा प्राण वाचवू शकते. यासाठी आपण अधिकृत दिलेल्या बँक खात्यावर पैसे पाठवून सर्वमला जीवन जगण्याची संधी देवू शकता.









No comments:

Post a Comment