जि.प आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक समिती मार्फत सत्कार - चंदगड लाईव्ह न्युज

28 September 2021

जि.प आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक समिती मार्फत सत्कार

मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सतिश माने यांचा सत्कार करताना समितीचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, बाजूला बोकडे,पाटील, धबाले आदी 

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

       मजरे कार्वे (ता. चंदगड) येथे चंदगड तालुका प्राथमिक शिक्षक समिती, च्या वतीने जि.प. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. 

      जि.प.कोल्हापूर यांच्या वतीने दिला जाणारा सन २०२१चा सर्वपल्ली राधाकृष्ण आदर्श शिक्षक पुरस्कार महिला आघाडी उपाध्यक्षा शितल पाटील (वि.मं, मुरकुटेवाडी) व सतीश माने (वि मं, कलीवडे) तसेच जे.पी नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक समितीच्या सीमा नांदवडेकर व आनंद गंगा फौंडेशन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार परशराम धबाले या आदर्श शिक्षकांचा सत्कार प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, सरचिटणीस एम.व्ही पाटील, शिक्षक समिती तालुका नेते प्रकाश बोकडे, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन मधुकर कोकितकर, उत्तम भोसले, जिल्हा प्रतिनिधी श्रद्धा संभाजीचे, राज्य प्रतिनिधी अर्चना शिंदे, मीना लोबो या मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

         प्रारंभी एम.व्ही पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष गोविंद पाटील व केंद्र प्रमुख जगताप यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केली. यावेळी केंद्र प्रमुख बाळू प्रधान,ना.वि.पाटील, संजय ढेरे,अर्चना शिंदे, सुनीता नाथा पाटील, चिंचनणगीकर, सुभाष चौगुले, प्रकाश पाटील, जोतिबा बामणे, राजाराम जोशी, युवराज कागणकर, विश्वनाथ गावडे, शिवाजी बिर्जे, विठ्ठल पिटुक, विलास पाटील, जोतीबा नाकाडी आदी शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचलन दयानंद पाटील यांनी केले व आभार आणाप्पा वांद्रे यांनी मानले.

No comments:

Post a Comment