ग्रामपंचायत कामगार संघटनेचा गुरुवारी चंदगडला मेळावा - चंदगड लाईव्ह न्युज

14 September 2021

ग्रामपंचायत कामगार संघटनेचा गुरुवारी चंदगडला मेळावा

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा             

महाराष्ट्र शासन, कामगार आयुक्त कार्यालयाच्या शासन निर्णय (१० ऑगस्ट २०२०) प्रमाणे राज्यातील सर्व ग्रापं. कर्मचाऱ्यांना नवीन किमान वेतनश्रेणीची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मान. ग्रामविकास मंत्री, कामगार मंत्री, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व आमदारांना 'ग्रामपंचायत कामगार संघ, आयटक सलग्न' संघटनेच्या वतीने निवेदने देऊनही काहीच हालचाली नाहीत. या व अशा अनेक प्रलंबित मागण्यांबाबत विचारविनिमय करण्यासाठी चंदगड तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मेळावा पंचायत समिती सभागृह चंदगड येथे गुरुवार दि. १६ रोजी दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र कांबळे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्यात मुख्य मागणीसह अन्य मागण्यांसाठी २४ सप्टेंबर रोजी कोल्हापूर जिल्हा परिषदेवर काढण्यात येणार्‍या भव्य मोर्चाचे नियोजन ठरविण्यात येणार आहे. तरी सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष परशराम जाधव, उपाध्यक्ष तानाजी वाईंगडे, संजय दळवी, एकनाथ राघोजी, शिवाजी कांबळे, संजय कांबळे आदींनी केले आहे.


No comments:

Post a Comment