एकावं ते नवलच चंदगड तालूक्यात म्हैसीने दिला चक्क वासराला जन्म, कोठे घडली घटना.... - चंदगड लाईव्ह न्युज

24 September 2021

एकावं ते नवलच चंदगड तालूक्यात म्हैसीने दिला चक्क वासराला जन्म, कोठे घडली घटना....

 

गोंडस वासराला जन्म दिलेली म्हैस वासरासोबत

तेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा
        या जगात काय घडेल हे सांगता येत नाही. काल बाई म्या नवल ऐकीले, पाण्याला मोठी लागली तहान, बकऱ्या पुढे बाई देवच कापिला, या एकनाथ महाराजांच्या भारूडाची आठवण आज चंदगड वासीयाना आली. चक्क म्हैसीने वासरालाच जन्म दिल्याने ऐकावं ते नवलचं ठरलेल्या या घटनेची जोरदार चर्चा चंदगड तालूक्यात चालू आहे.
      म्हैशीच्या पोटी वासरू (गायीचे पिल्लू) जन्माला आल्याची घटना चंदगड तालुक्यातील तावरेवाडी गावात घडली आहे. 
   यासंदर्भात म्हैस मालकाकडून मिळालेली माहिती अशी की,  तावरेवाडी गावचे पहिले सरपंच मारुती गंगाराम कागणकर यांचा लहान मुलगा परशराम कागणकर यांच्याकडे पंचकल्यानी जातीची म्हैस आहे. त्या म्हैशीच्या पोटी जन्माला आलेले पिल्लू हे गायीच्या वासरासारखे दिसून येते. या म्हैशीला प्रजननासाठी लसीकरण करण्यात आले होते, अशी माहिती म्हैस मालक परशराम कागणकर यांनी सांगितली. या घटनेबाबत तालुक्यात चर्चा सुरू असून परिसरातील लोक बघण्यासाठी गर्दी करत आहेत. कदाचित गायीची लस चूकीने म्हैसीला दिली गेली असल्याने असा प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 






No comments:

Post a Comment