कालकुंद्री येथे दुर्गा दौडीचा अभूतपूर्व उत्साह! श्रीराम सेना, हिंदुराष्ट्र सेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष, कार्यकर्त्यांची उपस्थिती - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2021

कालकुंद्री येथे दुर्गा दौडीचा अभूतपूर्व उत्साह! श्रीराम सेना, हिंदुराष्ट्र सेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष, कार्यकर्त्यांची उपस्थिती

कालकुंद्री (ता. चंदगड) येथे दुर्गा दौडमध्ये सामील झालेले धारकरी तरुण, तरुणी, मुले.

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
        कालकुंद्री (ता. चंदगड) येथे आज शारदीय नवरात्रोत्सवातील दुर्गा दौडीच्या अखेरच्या दिवशी अभूतपूर्व उत्साह दिसून आला. पहाटे सुरू झालेल्या दौडीत शेकडोंच्या संख्येने मुले, मुली, तरुण सहभागी झाले होते. दुर्गा दौड समाप्तीनंतर कलमेश्वर मंदिर सभागृहात श्रीराम सेना, हिंदुराष्ट्र सेना बेळगाव जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बेळगाव सीमा भागातून विविध गावांतील अमित पाटील, विनायक हंगिर्गेकर, संतोष जाधव, तुकाराम मरगाळे, मनोज पाटील, लखन भाटे, सदाशिव पाटील मनोज देसुरकर आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
    स्वराज्य ग्रुप व विविध तरुण मंडळांच्यावतीने कालकुंद्री येथे सुरू करण्यात आलेल्या दुर्गा दौडचे यंदा पंधरावे वर्ष आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुण-तरुणींमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे कार्य निरंतर सुरू आहे. 
   वाममार्गाला लागणारे तरुण विधायक कार्याकडे वळतील ही अपेक्षा असून त्यांनी आपले आई-वडील, गाव पर्यायाने देश, धर्माचे नाव आपल्या कार्यकर्तृत्वाने उज्ज्वल करावे. व्यसनांपासून दूर राहा! कष्ट, परिश्रम, जिद्द, महत्वाकांक्षा ठेवून स्वतः सह घर व देशाच्या प्रगतीत हातभार लावा. असे विचार श्रीराम सेना बेळगाव जिल्हाध्यक्ष रविकुमार कोकितकर यांनी व्यक्त केले. चंदगड तालुक्यात दुर्गा दौड मध्ये येण्याची आपली पहिलीच वेळ असून कालकुंद्री येथील वातावरण पाहून आपण भारावून गेलो आहोत. असे गौरवोद्गार काढले. यावेळी स्वराज्य ग्रुप चे सर्व सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सुदर्शन पाटील यांनी मानले.

No comments:

Post a Comment