दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने केले चंदगड तालुक्यातील दोन धनगरवाडयावर शैक्षणिक सीमोल्लंघन - चंदगड लाईव्ह न्युज

15 October 2021

दाटे येथील रयत सेवा फौंडेशनने केले चंदगड तालुक्यातील दोन धनगरवाडयावर शैक्षणिक सीमोल्लंघन

फाउंडेशनच्या प्रयत्नातून दोन मिनी अंगणवाडींचा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शुभारंभ



तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात तालुक्यातील धनगरवाडे आज सुध्दा  अनेक सोयीसुविधापासून वंचित आहेत. 
जेमतेम दिडशे लोकवस्तीच्या धनगरवाड्यात आरोग्य, शिक्षण, रस्ता, अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, दवाखाना, दूध डेअरी या सारख्या सुविधाची सोय नाही. धनगरवाड्यातील मुलांना दहा किलोमीटर पायपीट करून चंदगड येथील शाळेमध्ये शिक्षणासाठी यावे लागते. अंगणवाडीच्या वयोगटातील मुले शाळेला जाऊ शकत नाही.दाटे ( ता. चंदगड ) येथील रयत सेवा फौंड़ेशनने कोरोनामध्ये लॉकडाऊनच्या काळात काजीरणे-धनगरवाडयातील मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी तीन महिण्यांचा मोफत मोबाईल रिचार्ज  भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी  अंगणवाडीची समस्या लोकांनी सांगितली. तसेच कलीवडे-धनगरवाडा येथे फाउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबीर आयोजित केले होते. फौंडेशनचे मार्गदर्शक तथा मंत्रालयीन अधिकारी घनश्याम पाऊसकर यांनी  चंदगड तालुक्यात काजीर्णे-धनगरवाडा व कलीवडे-धनगरवाडा येथे अशा दोन ठिकाणी  मिनी अंगणवाडया मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. घनश्याम पाऊसकर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे धनगरवाडयावर शिक्षणाची पहाट उगवली. याकामी त्यांना एकात्मिक बालविकास प्रकल्प सहाय्यक आयुक्त क्षीरसागर, महिला व बालविकास कक्ष अधिकारी दत्तप्रकाश जाधव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश गजलवाड यांचे सहकार्य मिळाले.
यावेळी कार्यक्रमाला मारूती किंदळेकर, प्रकाश खरूजकर, ज्ञानेश्वर गावडे, परशराम किणेकर, महादेव साबळे, मनोज खरूजकर, संजय साबळे,अमोल सुतार,युवराज कांबळे जगन्नाथ यमकर, देहू यमकर, बाबू पाटील ,सिध्दू यमकर, लक्ष्मण कोकरे, जानू यमकर, प्रतिक्षा यमकर उपस्थित होते.




No comments:

Post a Comment