चंदगड शहरात भटक्या कुत्र्यांच्यामुळे नागरीक हैराण, नगरपंचायतीने उपाययोजना करण्याची गरज, नागरीकांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

06 October 2021

चंदगड शहरात भटक्या कुत्र्यांच्यामुळे नागरीक हैराण, नगरपंचायतीने उपाययोजना करण्याची गरज, नागरीकांची मागणी

कुत्रा


चेतन शेरेगार / चंदगड -सी. एल. वृत्तसेवा

          चंदगड नगरपंचायत क्षेत्रात अनेक भटके कुत्रे असून त्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भटक्या कुत्र्यांमुळे चंदगड शहरातील नागरिक हैराण झाले असून कॉलेज रोड पंचायत समिती परिसर, नवीन वसाहत, विनायक नगर , एसटी स्टँड परिसर मध्ये रात्री नाक्यावर कुत्रे टोळीने उभे असतात. दुचाकी वाहन चालकांच्या मागे हे कुत्रे लागत असल्याने अपघातही घडले आहेत. नुकतेच  पिसाळलेल्या कुत्र्याने वयोवृद्ध व लहान मुलांना जखमी केले. अशाचप्रकारच्या घटना  घडल्या आहेत.

      भटके कुत्रे प्रचंड प्रमाणात वाढले असून नगर पंचायतीने त्यावर ठोस उपाय करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत. नगरपालिका क्षेत्रात हजारांहून अधिक भटके कुत्रे असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे श्वान निर्बिजीकरण केंद्रां’ची स्थापना करावी अशी मागणी होत आहे.

        भटके कुत्रे रस्त्यावर असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला यांना अधिक त्रास होतो. रात्री उशिरा घरी परतणाऱ्यानाही कुत्र्यांची भीती असतेच. शिवाय सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांच्या पाठी कुत्रे लागतात. त्यात एखादा कुत्रा पिसाळला किंवा जखमी झाला तर त्या परिसरात धुमाकूळ घालतो. शहरातील रहिवासी कुत्र्यांना वैतागले आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी याआधी ज्येष्ठ नागरिक संघटना, नगरसेवक व इतर संघटना, राजकीय पक्षांनीही चंदगड नगरपंचायतीकडे केली होती. मात्र नगर पंचायत अधिकारी गांभीर्याने बघत नसल्याने ही समस्या अधिक जटील बनत चालली आहे. त्यामुळे श्वान निर्बिजीकरण केंद्र चंदगड नगरपंचायत  हद्दीत स्थापन केल्यास भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर काही प्रमाणात नियंत्रण येऊ शकते. अन्यथा भविष्यात हि समस्या आणखी जटील बनु शकते. त्यामुळे नगरपंचायतीच्या वतीने यावर वेळीच योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरीकांच्यातून होत आहे. 


No comments:

Post a Comment