ई-पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या बदलीसाठी तलाठी संघटनेची चंदगड येथे निदर्शने - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

ई-पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांच्या बदलीसाठी तलाठी संघटनेची चंदगड येथे निदर्शने

उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांची ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक पदावरून बदली करावी. या मागणीसाठी चंदगड येथे तलाठी, मंडल अधिकारी यानी निदर्शने केली.

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        ई-फेरफार, ई-चावडी व ई-पीक प्रकल्पाचे राज्य समन्वयक उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी तलाठी संघटनेचे अध्यक्ष, पदाधिकारी यांच्याबद्दल केलेल्या अर्वाच्च व असंसदीय विधानाबद्दल व त्यांच्या या वागणुकीबाबत त्यांची राज्य समन्वयक पदावरून तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य तलाठी संघ शाखा चंदगड यांच्या वतीने चंदगड तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

          महाराष्ट्र राज्य महासंघाच्या वतीने आंदोलन सुरू केले असून याचा दुसरा टप्पा म्हणून राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर आज निदर्शने झाली, त्यामध्ये चंदगड तलाठी संघ सहभागी झाला होता. चंदगड तालुक्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी तसेच चंदगड तालुका तलाठी व मंडळ अधिकारी संघटना अध्यक्ष  विठ्ठल शिवणगेकर 'सचिव आनंद म्हसवेकर, मंडळ अधिकारी शरद मगदूम , अप्पासाहेब जिनराळे, अमर पाटील, सुरेश टिपूगडे याचबरोबर तलाठी वैभव कोंडेकर ,ओंकार नाईक, अमर संगरुळकर,दीपक कांबळे,सुरेश जुवेकर,राजश्री पंचडी, यासह तालुक्यातील सर्व तलाठी उपस्थित होते.मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. या मागणीचा गांभीर्याने विचार करुन जगताप यांनी बदली करावी अन्यथा १२ अक्टोबर रोजी तहसीलदार यांच्याकडे डी. एस. सी. जमा करणे, रामदास जगताप यांची राज्य समन्वयक पदावरुन अन्यत्र बदली न झाल्यास १३ अक्टोबर रोजी पासून नैसर्गिक आपत्ती व निवडणूक कामे वगळता सर्व कामावर बहिष्कार घालण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment