महागाव येथील संत गजानन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

महागाव येथील संत गजानन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्यासमवेत महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक.

महागाव / सी. एल. वृत्तसेवा

        महागांव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज शिक्षण समुहाच्या अभियांत्रिकी विभागामधील १३२ विद्यार्थ्याची विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये निवड झाली कंपन्याकडुन त्यांना ३ ते ५ लाख पर्यंतचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्याची निवड ऑनलाईन टेस्ट खुलाखतीदवारे करण्यात आली. यामध्ये सुप्रिया दोरुगडे Accenture) सोमनाथ शिंत्रे व बॉबी चिलमी »Acty Systems) सायली पाटील (Illusion), गणेश महेंद्रकर (Tech Mahindra) पुजा पाटील (Atos Global) अभिषेक घस्ती, प्रशांत कोडोळी व मृणाली पाटील (Infosys), संध्याराणी पट्टणकुडी ( DXC Technology) आणी निलम शिखरे (Proventeq) या विद्यार्थ्याची निवड झाली.

          बॉबी चिलमी व सोमनाथ शिंत्रे हे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये अंतिम वर्षात शिकत असुन या विद्यार्थ्याची निवड ही इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायक आहे. याबरोबरच विविध कंपन्याचे रिझल्ट अद्याप जाहिर होणार आहेत.

        नामांकित कंपन्यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्याचा सत्कार कॉलेजचे प्राचार्य डॉ संजय सावंत यांच्या हस्ते करण्यात आला ही बाब इतर विद्यार्थ्यासाठी प्रेरणादायी असून याचे श्रेय ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे आहे कारण गेल्या दोन वर्षापासुन अॅप्टीट्यूड कम्युनिकेशन, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट अशा विविध कौशल्यासाठी कायमच या विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर तृतीय वर्षासाठीचा TCS, WIPRO, NTT Data, Reliance Life Science, ATOS Syntel या नामांकित कंपनीचा प्लेसमेंट संदर्भातील निकाल येत्या काही दिवसात अपेक्षित असुन यामध्ये सुद्धा SGM आपला वेगळा ठसा उमटवेल अशी खात्री संस्थापक अध्यक्ष अँड अण्णासाहेब चव्हाण यांनी व्यक्त केली.

       आतापर्यंत २८ पेक्षा जास्त नामांकित कंपन्यामधून १३२ हून अधिक विद्यार्थ्याना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यामध्ये संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविदयालय अग्रेसर राहिले आहे अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. यशवंत चव्हाण व डॉ. संजय चव्हाण यांनी दिली.

        या कामी सचिव अॅड. बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य डॉ. संजय सावंत, प्रा. संतोष गुरव प्रा. महादेव बंदी, सर्व विभागप्रमुख व सर्व शिक्षकांचे सहकार्य मिळाले आहे.No comments:

Post a Comment