वाचन प्रेरणा दिनानिमित्त तालुकास्तरीय विद्यार्थी व शिक्षकांसाठी अभिवाचन स्पर्धा - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

वाचन प्रेरणा दिनानिमित्त तालुकास्तरीय विद्यार्थी व शिक्षकांसाठी अभिवाचन स्पर्धा

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

           भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यातील प्रत्येक शाळेमध्ये "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा केला जातो. या निमित्त चंदगड मराठी अध्यापक संघाच्या वतीने  विद्यार्थी अभिवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी निकष व अटी पुढीलप्रमाणे-

विद्यार्थ्यांसाठी दोन गटात ही स्पर्धा होईल त्यासाठी 

१) ५ वी ते ७ वी ,२) ८ वी ते १० वी,३ ) शिक्षक

          विद्यार्थ्यांनी /शिक्षकांनी कोणताही २ मिनिटांचा एखादा उतारा, लेख अथवा परिच्छेदाचे वाचन व्हिडिओ रेकॉर्ड करून खालील क्रमांकावर १५ ऑक्टो २०२० संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आपले व शाळेचे पूर्ण नाव, पत्ता व मोबाईल क्रमांकासह पाठवावे. व्हीडीओ करताना मोबाईल आडवा धरून रेकॉर्ड करावे. व्हीडीओ २ मिनीटापेक्षा मोठा नसावा. ५ वी ते ७ वीच्या विद्यार्थ्यांनी श्री. धुमाळे ९४२०३५७१७८ व्हाट्सअप् वर पाठवावे. ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांनी पी. के. पाटील -९४२१११२९२0 व्हाट्सअप वर पाठवावे. शिक्षकांनी सौ. बल्लाळ 9420777199 यांच्या व्हाट्स ॲपवर पाठवावे. प्रत्येक गटातून प्रथम तीन विजेत्यांना ई-प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. स्पर्धेचा निकाल २० ऑक्टोबर २०२१ रोजी कार्यक्रमात जाहीर करण्यात येईल. परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील. शिक्षकांनी आपल्या विद्यालयातील  विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी करावे.



No comments:

Post a Comment