चंदगड येथील बहुपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा, तहसिलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

चंदगड येथील बहुपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा, तहसिलदारांना निवेदन

बहुपक्षीय कार्यकर्ते तहसिलदार यांना निवेदन देताना.


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

         गेले वर्षभर दिल्ली हरियाणा सीमेवर देशातील लाखो शेतकरी जाचक शेतीविषयक विधायक यांचा निषेध व विरोध करण्यासाठी धरणे आंदोलन करीत आहेत. पण शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांचे प्रश्न न सोडवता हुकूमशाही केंद्र सरकार गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत. शेतीसाठी लागणारी बी-बियाणे व खते यांची दरवाढ करून शेतकऱ्यांना  त्रास केंद्र सरकार देत असल्याच्या निषेधार्थ चंदगड येथे बहुपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढून निवेदन देऊन सत्ताधारी भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.

        मागील आठवड्यात शेतकरी आंदोलनात लखीमपुर येथे केंद्रातील भाजप मंत्र्याच्या  पुत्राने बेफाम वाहन चालवून अनेक शेतकऱ्यांच्या जीव घेतला. अशा भाजप सरकारने शेतकऱ्यावर चाललेले अन्याय थांबून आरोपीस कठोर शासन करावे अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी दिला. यावेळी गोपाळराव पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे नितीन पाटील, चंदगड तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे यांना मोर्चाने येऊन कार्यकर्त्यानी निवेदन दिले. यावेळी चंदगडच्या नगराध्यक्षा प्राची काणेकर, पं. स. सदस्य दयानंद काणेकर, नगरसेवक आनंद हळदणकर, अभिजित गुरबे, संजय पाटील, विशाल पाटील, राजेंद्र परीट, भिकू गावडे, संदीप नांदवडेकर, नितीन फटक, प्रवीण वाटंगी, तानाजी गडकरी, विष्णू गावडे, गोविंद पाटील यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment