तुडिये येथे दुर्गा महादौडीत अकराशे धारकऱ्यांचा सहभाग, युवकांचा मोठा सहभाग - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

तुडिये येथे दुर्गा महादौडीत अकराशे धारकऱ्यांचा सहभाग, युवकांचा मोठा सहभाग

तुडिये येथे दुर्गा दौडीत सहभागी धारकरी व ग्रामस्थ

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

       तुडिये (ता. चंदगड) येथे सालाबादप्रमाणे शिवप्रतिष्ठान शाखेमार्फत महा दौडीचे आयोजन करण्यात आले. शिवाजी चौक येथील शिव स्मारकाला अभिवादन व राष्ट्रभक्ती धाराचे वाचन करून दौड सुरू झाली. 

      कोविड महामारीत  महादौडच्या  निमित्ताने   बऱ्याच दिवसानंतर गावासह परिसरात  उत्साहाचे वातावरण होते. गावातील सर्वच रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या, गल्लोगल्ली प्रवेशद्वारांवर स्वागत कमानी उभारून दौडीचे स्वागत करण्यात आले. गावभर भगव्या पताका, भगवे झेंडे लावल्याने परिसर भगवामय झाला आहे. गावातील आबालवृद्धांनी यात उत्स्फुर्त सहभाग घेतला. महादौडमध्ये तुडियेसह  मळवी, कोलीक, म्हाळुंगे, सरोळी, सुरुते, ढेकोळी, शिनोळी आदी गावातील सुमारे अकराशे  धारकरी सहभागी झाले होते. यावेळी निळू कर्लेकर यांनी देणगी स्वरूपात दिलेल्या  शिवप्रतिष्ठानच्या सूचना फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. राष्ट्रभक्ती धारा व दौड चे महत्व सांगून आगामी दुर्गमोहिमांत सहभागी होण्याचे आवाहन शिवाजी चौकातील दौडीच्या सांगता कार्यक्रमात करण्यात आले.

No comments:

Post a Comment