कोवाड बाजारपेठ कडकडीत बंद, महाराष्ट्र बंदला १०० टक्के प्रतिसाद, बाजारपेठेत काय आहे परिस्थिती, वाचा सविस्तर...... - चंदगड लाईव्ह न्युज

11 October 2021

कोवाड बाजारपेठ कडकडीत बंद, महाराष्ट्र बंदला १०० टक्के प्रतिसाद, बाजारपेठेत काय आहे परिस्थिती, वाचा सविस्तर......

 

बंदच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण कोवाड बाजारपेठ बंद होती.

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा
         उत्तर प्रदेशात आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून नऊ शेतकऱ्यांची हत्या करण्यात आली. याला जबाबदार असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्याचा मुलगा व त्याचे साथीदार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या उत्तर प्रदेशातील योगी व केंद्रातील मोदी सरकारचा निषेध तसेच दोषींना कठोर शासन करावे. या मागणीसाठी महा विकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी पक्षांनी आज सोमवार दि. ११ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. याला कोवाड व परिसरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. 
बंदमध्ये सहभागी झालेले व्यापारी.
       देशातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येथील पाचशेपेक्षा अधिक व्यापारी बंधूंनी बंदमध्ये सामील होण्याची मानसिकता आधीच ठेवल्यामुळे सकाळपासून केवळ दवाखाने व मेडिकल दुकाने वगळता सर्व दुकाने बंद होती. बंद शांततेत पाळण्याचे आवाहन करण्यासाठी जि प सदस्य कल्लापाण्णा भोगण, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक मनवाडकर, शहर प्रमुख शिवप्रसाद अंगडी, उपसरपंच पुंडलिक जाधव, माजी उपसरपंच विष्णू आडाव व श्रीकांत पाटील, रणजीत भातकांडे, रामचंद्र व्हन्याळकर, बंडू तोगले, खंडोजी पाटील, नारायण कणुकले, दयानंद लांडे, अनिल भोगण, दीपक कोरी, विठ्ठल वांद्रे आदी पदाधिकारी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कोवाड बाजारपेठ व ताम्रपर्णी नदी पलीकडील किणी परिसरात फेरी काढून बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांवरील मानव निर्मित अन्याय अत्याचार केंद्र शासनाने तात्काळ थांबवावा अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment