फाटकवाडी प्रकल्पातील गळतीची तात्काळ दुरूस्ती करा - पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांनी दिले निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

08 October 2021

फाटकवाडी प्रकल्पातील गळतीची तात्काळ दुरूस्ती करा - पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांनी दिले निवेदन

 

फाटकवाडी (ता. चंदगड) येथील मध्यम प्रकल्पाला लागलेली गळतीची तात्काळ दुरुस्तीची मागणीचे निवेदन पाटबंधारे अभियंता देताना नितीन फाटक, सरपंच पारशे,रेगडे,कसबले,पाटील आदी शेतकरी

चंदगड / प्रतिनिधी
फाटकवाडी (ता. चंदगड) येथील मध्यम प्रकल्पाला लागलेली गळती तातडीने दुरुस्ती  करावी या मााागणीचे निवेदन पाटबंधारे विभागाला शेतकऱ्यांनी दिले.फाटकवाडी मध्यम प्रकल्प  चंदगड व कर्नाटक राज्याच्या प्रमुख स्त्रोत आहे .या प्रकल्पातून मोठया प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे.त्यामुळे ही गळती तातडीने थांबविणे गरजेचे आहे . सन २०१ ९ साली मध्यम प्रकल्प संदर्भ अनेक वेळा शेतकऱ्यांनी केल्या होत्या त्याकडे , पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, प्रकल्पाच्या चारी बाजूने  झाडेझुडपे वाढली आहेत , या मध्यम प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात जी गावे येतात . त्या गावातील नागरिकाना सन २०१ ९ प्रमाणे जिव मुठीत घेऊन राहण्याची वेळ प्रशासनाने आणू नये . तसेच जी अतिगळती सुरु आहे . त्यामुळे धरणाचा साठा कमी होऊ शकतो . त्याचा फटका एप्रिल व मे महिन्यात पिकांना बसणार आहे परिणामी शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान होऊ शकते, पंधरा दिवसात गळती दुरूस्तीवर  ठोस उपाययोजना न झाल्यास तीव आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे निवेदनाच्या प्रति पालकमंत्री,प्रांताधिकारी, तहसिलदार याना देण्यात आल्या आहे.निवेदनावर नितीन पांडूरंग फाटक,.रामू पारशे, कृष्णा रेगडे, विजय आप्पा गावडे, रविंद्र कसबले,दिपक गावडे ,संजय भिवा गावडे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

No comments:

Post a Comment