हेरे सरंजाम वर्ग -२ च्या जमिनी लवकर वर्ग -१ करण्यासाठी प्रांताधिकारी याना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

29 October 2021

हेरे सरंजाम वर्ग -२ च्या जमिनी लवकर वर्ग -१ करण्यासाठी प्रांताधिकारी याना निवेदन

गडहिंग्लज येथे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे याना मागण्याचे निवेदन देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सेक्रेटरी सुरेश दळवी,गणेश दळवी,देसाई, पाटील 

चंदगड/प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील हेरे सरंजामच्या वर्ग -२च्या जमिनी वर्ग -१करण्यासाठी लवकरच मोहीम राबवून  प्रलंबित असलेला हा प्रश्न लवकरच मार्गी लावण्यात येईल.असे आश्वासन प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सेक्रेटरी सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली  शिस्टमंडळांने आज प्रांताधिकारी वाघमोडे  यांची भेट घेऊन हेरे सरंजामच्या वर्ग -2 च्या जमीनी वर्ग-1 लवकर कराव्यात या मागणीसह अन्य मागण्याबाबत निवेदन दिले.
निवेदनात तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासकीय आदेशानुसार ऑनलाइन केलेली पीक पाहणी अजून ७/१२ वर दिसत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपले भात शासनाकडे हमीभावा ने विकता येत नसल्याचे निदर्शनास आणले आणि पीक पहाणीची नोंद ताबडतोब ७/१२ वर करणेस  आदेश द्यावेत तसेच अडकुर येथील तलाठी कार्यालय बांधण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. अडकुरचे माजी उपसरपंच गणेश दळवी,सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ पाटील,शिवराज देसाई  यावेळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment