देवरवाडी : शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी मान्यवर व विद्यार्थी. |
कागणी : सी. एल. वृत्तसेवा
नाशिक येथील मुक्ताई बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने संस्थेचे चंदगड तालुका प्रमुख अरुण विठ्ठल जाधव यांच्या सहकार्याने अंगणवाडी ते दहावी पर्यंत शिकणाऱ्या मुला मुलींना शैक्षणिक साहित्य, बॅग, कंपास पेटी अर्धा डझन वह्या, पाणी बॉटल, बूट व जर्किन असे साहित्य वाटप करण्यात आले.
आथर्व संदिप भोगण, प्रणाली परशराम भोगण, सात्वीक शिवकुमार पुजारी, श्लोक रघुनाथ शिंदोळकर, रसिक विजय सुतार, रोहन कृष्णा भांदुर्गे अशा एकूण 20 विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी देवरवाडी गावच्या सरपंच गिता सुतार, उपसरपंच गोविंद आडाव उपस्थित होत्या. यावेळी देवरवाडीचे सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक कांबळे, उमेश भांदुर्गे तसेच पालक महेश जाधव, भिमराव भोगण, विजय सुतार, नागराज पुजारी, पांडू आडाव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment