केंचेवाडी पोलीस पाटील यांच्या विरोधात ग्रामस्थांची प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2021

केंचेवाडी पोलीस पाटील यांच्या विरोधात ग्रामस्थांची प्रांताधिकारी यांच्याकडे तक्रार

प्रांताधिकारी यांना निवेदन देताना केंचेवाडी ग्रामस्थ.

 चंदगड / प्रतिनिधी

            केंचेवाडी (ता. चंदगड) येथील पोलिस पाटील यांच्या मनमाणी कारभाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी गडहिंग्लज यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.                      केंचेवाडी येथील गावचे पोलीस पाटील शिवाजी लक्ष्मण पाटील हे गावातील लोकांत भांडण, तंटा, कळ लावण्याचे काम करत आहेत. ग्रामस्थांच्या रस्त्यावर अतिक्रमण करून आडवणे असे वारंवार करत आहे. कोणत्याही शासकीय कामाबद्दल माहिती विचारण्यास गेले तर टाळाटाळ करणे, मला काय एवढेच काम आहे का? असे उद्धट उत्तरे देत आहे. मी म्हणेन तेच योग्य अशा प्रकारे हे पोलीस पाटील वागत आहेत. तसेच त्यांना पाच अपत्य आहेत. तरी याबाबत चौकशी करून त्यांना या पदावरून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केंचेवाडी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. गावडू अनंत गावडे (सरपंच केंचेवाडी ग्रामस्थ) यांनी सहीने  निवेदन उपविभागीय अधिकारी गडहिंग्लज कार्यालयात तक्रार दाखल केले आहे.

No comments:

Post a Comment