कलिवडे शाळेचे कार्य आदर्शवत! - शिक्षण व अर्थ सभापती रसिका पाटील - चंदगड लाईव्ह न्युज

13 October 2021

कलिवडे शाळेचे कार्य आदर्शवत! - शिक्षण व अर्थ सभापती रसिका पाटील

कलिवडे शाळेतील उपक्रमांची पाहणी करताना शिक्षण सभापती रसिका पाटील, विद्या पाटील, सौ सुभेदार आदी.
कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा
         कलिवडे (ता. चंदगड) शाळेचे कार्य जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात आदर्शवत आहे. असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ समिती सभापती रसिका पाटील यांनी काढले. चंदगड तालुक्यातील ऐतिहासिक कलानिधी गडाच्या पायथ्याशी असलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यामंदिर कलिवडे शाळेला नुकतीच सदिच्छा भेट प्रसंगी त्या बोलत होत्या.
 स्वागत मुख्याध्यापक दत्तात्रय भाटे यांनी केले. पाटील यांनी शाळेने राबविलेल्या  अत्याधुनिक संगणक लॅब, स्टडी टेबल, ग्रीन बोर्ड, व्हाईट बोर्ड, ताटांचे स्टँड, नाविन्यपूर्ण प्रयोगशाळा, ज्ञानरचनावाद, प्रशस्त सभागृह, आकर्षक कार्यालय, इ-लर्निंग आदी उपक्रम जाणून घेतले. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद औरंगाबाद साठी शाळेची निवड झाल्याबद्दल व शाळेचा कायापालट करण्यात व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांच्या सहभागाचेही कौतुक केले. शाळेतील सतीश माने यांचा जिल्हा पुरस्काराबद्दल तर ४ थी प्रज्ञाशोध परीक्षेतील यशाबद्दल विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक मंगेश शिंदे यांचा रसिका पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जि.प.सदस्या विद्या पाटील, गटशिक्षणाधिकारी सौ एस एस सुभेदार, विस्तार अधिकारी एम. टी. कांबळे, केंद्रप्रमुख वाय के चौधरी, तुडये केंद्रप्रमुख शामराव पाटील, सरपंच अमृत कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापनचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. शा.व्य.समिती अध्यक्ष अशोक कदम यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment