कुदनुर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ - चंदगड लाईव्ह न्युज

21 October 2021

कुदनुर येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

सिद्धेश्वर मंदिर कुदनुर येथे पेविंग ब्लॉक बसवणे कामाचा शुभारंभ करताना मान्यवर.


कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

      कुदनुर (ता. चंदगड) येथे जि. प. सदस्य कल्लाप्पाण्णा भोगण यांच्या प्रयत्नातून मंजूर विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी दौलतचे माजी चेअरमन गोपाळराव पाटील होते.

      सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सप्ताह कमिटी व वडर समाज मंडळाच्यावतीने उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. यावेळी बोलताना कल्लाप्पा भोगण म्हणाले आपल्या तालुक्यातील ग्रामपंचायती अजून आर्थिक दृष्ट्या सक्षम नाहीत. तरीही गावातील एकोप्याच्या जोरावर विकास साधता येतो. सामान्य जनतेच्या विश्वासावरच आपण भागाचा विकास साधण्याचा प्रयत्न करत असून कुदनूर किटवाड रस्ता, कुदनुर दुंडगे तेऊरवाडी रस्ता, दलित वस्ती, वडर समाज मंदिर, सिद्धेश्वर मंदिर सुशोभीकरण, कुदनूर अंतर्गत रस्ते आदींसाठी १ कोटी ६२ लाखांचा निधी आणल्याचे सांगितले. यावेळी गोपाळराव पाटील, राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर आदींची भाषणे झाली. मान्यवरांच्या हस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि प सदस्या विद्या विलास पाटील, सामाजिक कार्यकर्ते विलास भावकू पाटील, उपसरपंच नामदेव कोकितकर, जनार्दन देसाई, गणपत पाटील, जुबेर काजी, विष्णू गावडे, राजू भिंगुडे, सिद्धाप्पा नागरदळेकर, भारती नौकुडकर, सुमन आंबेवाडकर, नंदा शहापूरकर, अंजना तरवार, अशोक गवंडी, चंद्रकांत कांबळे, यल्लाप्पा वडर आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन दस्तगीर उस्ताद यांनी केले. राजू रेडेकर यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment