चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
माणगांववाडी (ता. चंदगड) येथील जोतिबा निंगाप्पा गावडे (वय-68, माणगांववाडी, ता. चंदगड) हि व्यक्ती बुधवारी (ता.20) पासून बेपत्ता आहे. याबाबतची वर्दी वैजू गावडे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहीती अशी – जोतिबा गावडे हे २० ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० वाजता शेताकडे गवत आणण्यासाठी जात असल्याने घरातून सांगून निघून गेले. शेताकडे नातेवाईकांच्याकडे चौकशी करुन शोध घेतला असता ते कोठेही आढळून आले नाहीत. त्यामुळे याबाबतची वर्दी चंदगड पोलिसात दिली आहे. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून पो. ना. श्री. किल्लेदार तपास करत आहेत.
त्यांचे वर्णन पुढीलप्रमाणे – रंगाने गोरा, अंगाने मध्यम, नाक मोठे, उंची ५.५, केस बारीक काळे व पांढरे, अंगात तांबुस फिक्कट रंगाचा फुल हातोप्याचा शर्ट व फाफ पॅन्ट, मराठी बोलतात. अशी वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास चंदगड पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment