ओलम (हेमरस) साखर कारखाना २९२५ रुपये एकरकमी एफ आर पी देणार - बिझनेस हेड भरत कुंडल, १२ वा गळीत हंगाम शुभारंभ, सात लाखांचे उदिष्ट - चंदगड लाईव्ह न्युज

14 October 2021

ओलम (हेमरस) साखर कारखाना २९२५ रुपये एकरकमी एफ आर पी देणार - बिझनेस हेड भरत कुंडल, १२ वा गळीत हंगाम शुभारंभ, सात लाखांचे उदिष्ट

१२ व्या गळीत हंगामप्रसंगी ऊसाची मोळी गव्हाणीत टाकताना बिझनेस हेड भरत कुंडल,बाबासाहेब वाघमोडे,प्रांताधिकारी-गडहिंग्लज,सुधीर पाटील मुख्य शेती अधिकारी सह मान्यवर

कोवाड / सी. एल. वृत्तसेवा

         राजगोळी खुर्द -चनेहट्टी (ता. चंदगड) येथील ओलम (हेमरस) ऍग्रो इंडिया प्रा.लि. साखर कारखान्यात यंदाच्या १२ व्या गळीत हंगामात सुमारे सात लाखावर मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात येणार असून प्रति टन एकरकमी 2925 रु. एफ. आर. पी.  देणार असल्याची माहिती कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी मोळी पूजन कार्यक्रमा प्रसंगी दिली. 

       १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी १४ रोजी प्रमुख मान्यवरांच्या व शेतकऱ्यांच्या शुभहस्ते करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात कारखाना साईट वर  असलेल्या गणेश मंदिरात अभिषेक व पूजनाने करण्यात आली. गणेश पूजन व काटा पुजन प्रोसेस हेड शशांक शेखर यांच्या हस्ते करण्यात आले. ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन व मोळी पूजन बाबासाहेब वाघमोडे (उपविभागीय अधिकारी, गडहिंग्लज) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर व शेतकऱ्यांच्या हस्ते ऊस गव्हाणीत टाकण्यात आला. 

बिझनेस हेड भरत कुंडल

          यावेळी बोलताना कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल म्हणाले,  ``पाऊस चांगला झाल्याने ऊस टनेजमध्ये ही भरपूर प्रमाणात वाढ आहे. यंदा ऊसाचे क्षेत्र जास्त असल्याने भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यास गाळपास आणण्याचा प्रयत्न कारखाना प्रशासनाकडून केला जाईल. शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव देऊन येथील शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करू. पुढील काही दिवसांपासून ऊस उतारा जास्त मिळावा यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा गावोगावी घेण्यात घेण्यावर भर दिला जाईल. यावर्षी सात लाख मे. टना पेक्षा जास्त गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखाना प्रशासनाकडून प्रतिटन २९२५ रु. एफ आर पी एक रकमा देण्यात येणार असून गडहिंग्लज विभागामध्ये आम्ही देत असलेला दर हा उच्चांकी असेल. कर्मचारी व शेतकरी हा कारखानदारीचा कणा आहे. या सर्वांच्या सहकार्याने गळीत हंगाम यशस्वी होईल असा विश्वास यावेळी भरत कुंडल यांनी व्यक्त केला. 

काटा पूजन करतांना शशांक शेखर,प्रोसेस हेड

          यावेळी प्रांताधिकारी, बाबाहसाहेब वाघमोडे म्हणाले की, ``कर्नाटक बरोबरच चंदगड,आजरा,गडहिंग्लज सीमा भागातील शेतकऱ्यांसाठी हेमरस साखर कारखाना तारणहार ठरलेला असून भविष्यात प्रशासनाकडून कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

           यावेळी सुधीर पाटील (मुख्य शेती अधिकारी), अजित झुंजाणी (एच आर हेड), शरद मगदूम (मंडल अधिकारी, कोवाड), संताराम गुरव (हेमरस युनियन अध्यक्ष) रवळनाथ देवन (हेमरस यूनियन सेक्रेटरी), मावळेश्वर कुंभार (सरपंच राजगोळी(खुर्द), कविता पाटील (सरपंच राजगोळी(बु)), बसवगौडा हुदार, सुरेश हांजी, आप्पा वांद्रे, प्रदीप सोलापुरे, रामा वांद्रे, तानाजी पाटील, बाबू कांबळे, विजय कोले, ऊस तोडणी, वाहतूकदार बरोबरच शेती विभागातील अनिल पाटील, नामदेव पाटील, रंजीत सरदेसाई, भागोजी लांडे आणी इतर कर्मचारी, शेतकरी व वाहतूक ठेकेदार आदी उपस्थित होते.



No comments:

Post a Comment